पुढील चार वर्षात देशाची आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, माहिती आणि तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होवून भारत देश एक विकसित देश म्हणून विश्वभरारी घेईल असा विश्वास आहे असे मत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
मोदी सरकारच्या कार्यकाळाला 11 वर्षे झाली त्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा अशी आग्रही मागणी विविध मान्यवर पत्रकार महोदय यांनी केल्यामुळे, दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे की, एकवीसावे शतक, दुस-या दशकातील सन 2014 साल भारताला एक नवी दिशा देणारे ठरले. मा.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपाला लोकसभेत पूर्ण बहुमत मिळाले, मित्रपक्षांचे पाठबळ मिळाले आणि पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्तित्वात आले.
त्यानंतर पून्हा सन 2019 मध्ये मा.नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत, अधिक बहुमत जनतेने अधिक बहुमत प्रदान करुन पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची धुरा मा.नरेंद्र मोदी यांचेकडे सोपवली.
सन 2024 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडुन दिले आणि मित्रपक्षांच्या सहकार्याने मोदी- 3, सरकार जनतेच्या सेवेसाठी अस्तित्वात आले. मा.नरेंद्र मोदींच्या प्रभावामुळेच भाजपा प्रमुख पक्ष असलेले सरकार सलग तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये सत्तास्थानी आले.
गेल्या सुमारे 11 वर्षाच्या कालखंडात मोदी सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. देशाचे सार्वभौमत्व अखंड राखताना, आंतर्राष्ट्रीय स्तरावर भारत देश विश्वगुरु होता, आणि यापुढे होईल आणि कायम राहील असा आत्मविश्वास देशाभिमान्यांमध्ये जागृत केला. विकसनशीलतेकडून विकसित भारत बनवण्याच्या दृष्टीने आत्मनिर्भर होण्यासाठी दमदार पावले टाकली. भारत देश कोणावरही अवलंबुन राहु नये, परकीय चलनाचा साठा वाढावा म्हणून निर्यातीला प्रोत्साहन दिले. मेक इन इंडीया,च्या माध्यमातुन नव उदयोजक / उदयोजकांना प्रोत्साहन देत उदयोग क्षेत्राशी संबंधीत महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले.
सामाजिक विषमता कमी व्हावी म्हणून विविध स्तरावरुन प्रयत्न करण्यात आले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सामाजिक आरक्षण सोडून स्वतंत्र्य आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण निर्माण केले.
महिलांना मनात येईल तेव्हा तलाक देण्याच्या प्रथेला अर्थात तीन तलाक प्रथेविरुध्द कायदा पारित करुन, मुस्लीम महिलांचे होणारे शोषण थांबवण्याचा प्रामाणकि प्रयत्न केला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनी आक्रमकवृत्तीला सडेतोड उत्तर देत वेसण घातलीच तथापि पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर आणि त्यापूर्वी बालाकोट हवाई हल्ले करुन जागा दाखवून दिली. दहशतवादाविरुध्द जागतिक पातळीवर भारताच्या बाजुने समर्थक राष्ट्रांची फळी उभी केली.
पाकिस्तानच्या अटकेत असणा-या कुलभुषण जाधव या भारतीय अधिका-याला, फासावर लटकवण्याचा डाव उधळुन लावत, आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये जावून, फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळवली.
पुलवामा घटनेचा बदला म्हणून, बालाकोट हवाई हल्ले चढवणा-या, भारतीय वायुसेना अधिकारी अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानमध्ये पकडल्यावर 48 तासाच्या आत सन्मानाने सोडण्याची तजवीज पाकिस्तानने मोदी सरकारच्या धसक्याने केली. अशी घटना प्रथमच घडली. देशाला नवी दिशा देणारे आणि ये नया भारत है असे ठासून सांगणारे बुलंद नेतृत्व भारताला लाभले आहे कणखर,स्पष्ट भुमिका, मनापासूनचे प्रयत्न, आपल्या देशाविषयी, देशाच्या मातीविषयी अतिव आस्था- प्रेम, देशाच्या मजबुत आणि कमकुवत बाजुंचा चौफेर विचारकरुन प्रत्यक्ष कृती करणे, निसंग्धिग्ध परराष्ट्र धोरण, देशवासियांविषयी कर्तव्यपरायणता, पंतप्रधान नव्हे तर प्रधानसेवक अशी विनम्र भावना, एकही सुट्टी न घेता दिवसातील चोविस तासांपैकी सुमारे 21-22 तास जनतेला समर्पित, अश्या अनेक गुणवैशिष्टयांमुळे मा.नरेंद्र मोदी एक जागतिक स्तरावरील सर्वांत लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणून उदयाला आले आहेत. व्यक्तीगत महत्वाकांक्षा असलेले अनेक नेते जनतेने पाहीले असतील, तथापि आगा-पिछा नसणारा आणि देशहित सर्वोच्यस्थानी मानणारा देशआकांक्षा असणारा असा नेता निश्चितच दुर्मिळ म्हणावा लागेल.
आर्थिक निर्णय
1.जन धन योजना- 2014- गरिबांसाठी बॅन्कखाते उघडण्याची सुविधा 2.मुद्रा योजना- लघुउदयोजकांना
कर्ज 3.वस्तु व सेवा कर लागु – संपूर्ण देशात एकसंघ करप्रणाली
4. नोट बंदी—काळापैसा व बनावटचलन रोखण्यासाठी रुपये 500/- आणि रुपये 1000 च्या नोटा बंद.
5. डिजिटल इंडीया अभियान 6. मेक इन इंडीया- भारतात उत्पादन उदयोग वाढवण्याचा प्रयत्न
सामाजिक निर्णय
1.कलम 370 हटवणे- जम्मु आणि कश्मिरला दिलेला विशेष दर्जा रद्द 2.नागरिकता सुधारणा कायदा –(सीएए बिल) – शेजार देशातील अल्पसंख्यांकांना भारताचे नागरिकत्वआवश्यकतेप्रमाणे बहाल करणे
3. श्री राम मंदिराची उभारणी 4.अग्नीवीर योजना – लष्कर भरती- अल्पकालिन कालावधी निश्चित
5.राष्ट्रीय शिक्षण धोरण- शिक्षण प्रणालीत मोठा बदल. (10+2+3 ऐवजी 5+3+3+4) प्रणाली.
मातृभाषेतुन शिक्षण- कौशल्य विकासावर भर,एकात्मिक उच्य शिक्षण धोरण
6. स्वच्छ भारत अभियान7.आयुष्यमान भारत योजना8.उज्वला योजना
7.बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना असे लोकोपयोगि आणि काळाची गरज असलेले निर्णय मोदी सरकारने धडाडीने घेतले.
कोविड 19 मध्ये अतिशय संवेदनशीलपणे प्रभावी अंमलबजावणी. आंतर्राष्ट्रीय स्तरावर 21 जुन हा दिवस जागतिक योग दिन म्हणून संयुक्त राष्ट्राने जाहिर करणेबाबत भारताचा पुढाकार. जगातील बहुतांशी देशात दौरे करुन भारताने व्दिपक्षिय संबंध प्रस्थापित केले. तसेच जी-20 परिषदेचे सन 2023 मध्ये आयोजन नवी दिल्ली येथे करुन, जागतिकस्तरावर भारताचा विश्वगुरु म्हणून उदय झाला.
भारतातील प्रत्येक नागरिकाला विश्वास वाटेल आणि प्रत्येक राज्याला आवश्यकतेप्रमाणे सहाय्यभुत ठरेल अशीच मोदी सरकारची गेल्या 11 वर्षातील कामगिरी ठरली आहे. अश्या या बहुआयामी कार्याचा धावता आणि संक्षिप्त आढावा जनतेपुढे मांडताना निश्चितच अभिमान वाटतो. सातारा जिल्हयावर ना.नरेंद्र मोदी यांचे विशेष प्रेम आहे. त्या प्रेमापोटी ते दोन वेळा जिल्हयात आले होते. त्यांच्या माध्यमातुन सातारा जिल्हयाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सातारा जिल्हा विकसित जिल्हा करण्याचे आमचे प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होत आहेत याचे समाधान आहे.