अनेक सदस्यांचा महाराष्ट्र केसरी वर बहिष्कार

1095
Adv

साताऱ्याच्या कुस्ती परंपरेतला मुकूटमणी ठरणारा महाराष्ट्र केसरीचा कुस्ती थरार प्रत्यक्ष प्रदर्शनापूर्वीच श्रेय वादात अडकला आहे . छत्रपती शाहू क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वाराला साताऱ्याचे नामवंत मल्ल पैलवान श्रीरंग जाधव यांचे नाव देण्यास खुद्द संयोजकांनी विरोध दर्शवल्याने तालीम संघाच्या संचालकांमध्ये उभा वाद निर्माण झाला आहे . पै श्रीरंग जाधव यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून तालीम संघाच्या अनेक सदस्यांनी महाराष्ट्र केसरी च्या कुस्ती सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा खळबळजनक निर्णय घेतला आहे या निर्णयांमध्ये उपमहाराष्ट्र केसरी साहेबराव जाधव राष्ट्रीय कुस्तीपटू बलभीम भोसले महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे महाराष्ट्र केसरी गोरख सरक वनराज जाधव संजय राऊत इत्यादी संचालकांनी साहेबराव पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या एकाधिकारशाही विरोधात निषेध नोंदवला आहे

साताऱ्याच्या छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये तब्बल 61 वर्षांनी दहा वजनी गटांमध्ये महाराष्ट्र केसरीचा थरार रंगत आहे साताऱ्याच्या अस्मितेसाठी आणि ही स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून जिल्हा तालीम संघाचे संचालक वनराज जाधव राष्ट्रीय पंच प्राध्यापक दिलीप पवार यांनी प्रत्यक्ष वाद बाजूला ठेवून ही स्पर्धा निर्वेध पार पाडावी याकरिता समन्वयाची भूमिका ठेवली आहे .दिलीप पवार उर्फ दिलीप बापू यांनी दोन वर्षांपूर्वी बीव्हीजी कॅम्पसच्या प्रांगणावर मर्यादित स्वरूपात दहा वजनी गटांमध्ये ऑलम्पिक धरतीच्या कुस्ती स्पर्धा घेऊन त्या एकट्याच्या हिमतीवर यशस्वी करून दाखवल्या होत्या .याच स्पर्धेच्या यशस्वितेची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली होती गेल्या ऑक्‍टोबर ऑक्टोबर महिन्यात प्राध्यापक दिलीप जाधव यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्यात व्हावी याकरिता प्रस्ताव महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला दिला होता या स्पर्धेमध्ये कोल्हापूर बारामती पुणे हे तीन जिल्हे होते मात्र दिलीप बापूंचा कुस्ती स्पर्धेतील अनुभव आणि त्यांचे योगदान लक्षात घेऊन शरद पवारांनी महाराष्ट्र केसरी च्या स्पर्धेचे माप साताऱ्याच्या पदरात टाकले .ही स्पर्धा साताऱ्यात येणार त्यावेळी कोणी काय काय जबाबदाऱ्या पार पाडायच्या याचे नियोजनही पक्के ठरले होते .मात्र जेव्हापासून कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष साहेबराव पवार तसेच त्यांची पुढील पिढी सुधीर पवार आणि दिपक बापू पवार यांच्या आगमनानंतर यजमान पदाचे पूर्ण चित्रच बदलले स्पर्धेचा यजमानपदाचा सर्व बाज जिल्हा तालीम संघाचे आपण सर्वेसर्वा असल्याप्रमाणे दोन्ही पवार बंधूंनी आपल्या खांद्यावर घेतला आणि नाराजी नाट्याला सुरुवात झाली . या विषयी बोलताना उपमहाराष्ट्र केसरी साहेबराव जाधव आणि बलभीम भोसले म्हणाले या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनामागील प्राध्यापक दिलीप पवार यांची मोठी मेहनत आहे मात्र मेहनत दिलीप बापूंची आणि श्रेया दीपक बापूंचे हे आम्ही अजिबात चालून देणार नाही जिल्ह्याच्या कुस्ती परंपरेमध्ये अनेक पैलवानांचे मोठे योगदान आहे यामध्ये पैलवान श्रीरंग आप्पा जाधव यांचे नाव खूपच मोठे असून त्यांच्या नावाच्या कमानीला जर संयोजकांकडून विरोध होत असेल तर हा आम्हा कुस्तीपटू च्या दैवताचा मोठा अपमान आहे . महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला , कुस्ती परंपरेला सातार्‍यात होणाऱ्या कुस्ती सोहळ्याला अजिबात विरोध नाही मात्र महाराष्ट्र केसरी च्या नावाखाली जर कोणी स्वतःची एकाधिकारशाही राबवणार असेल आणि त्या माध्यमातून स्वतःचा फायदा करून घेणारा असेल तर अशा नष्टचर्य परंपरेला आमचा कडाडून विरोध आहे .कोणीही त्या पद्धतीचे समज करून घेऊ नयेत .

यासंदर्भात वनराज जाधव सुद्धा म्हणाले पैलवान श्रीरंग आप्पा जाधव हे साताऱ्याच्या कुस्ती परंपरेतील एक सोन्याचे पान आहे त्यांचे कर्तृत्व मोठे असून जिल्ह्याच्या कुस्ती परंपरेला एक वेगळी दिशा देण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला सातारा जिल्हा तालीम संघ म्हणजे एकटे साहेबराव पवार नव्हेत . तालीम संघाच्या उभारणीमध्ये अनेक जणांचे योगदान आहे त्यांचे योगदान नाकारणे म्हणजे आमच्या दैवताचा अपमान करण्यासारखे आहे जर पवार कुटुंबीयांकडून तो त्यांच्या कमानीला विरोध करून होणार असेल तर आमचा या महाराष्ट्र केसरीच्या सोहळ्यावर बहिष्कार आहे पवार कुटुंबीयांच्या एकाधिकारशाहीला आमचा पूर्णपणे विरोध असून त्यांची कोणतीही मनमानी आम्ही चालू देणार नाही अशी तीव्र टोकाची भूमिका वनराज जाधव यांनी मांडली आहे .

गेल्या पंधरा वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने साताऱ्याला यजमान पदासाठी चार वेळा संधी दिली होती मात्र प्रत्येक वेळी स्पर्धा तोंडावर आली असताना याच पवार बंधूंच्या माध्यमातून तालीम संघाने या यजमानपद आला नकार देऊन कुस्तीगीर परिषदेला तोंडावर पाडण्याचा प्रकार केला असा धक्कादायक खुलासा तालीम संघाच्या काही सदस्यांनी प्रसारमाध्यमां जवळ केला . हे वृत्तांकन साताऱ्याच्या परंपरेला किंवा कुस्ती परंपरेला धक्का लागावा म्हणून केले जात नाही याची कुस्तीपटूंनी नोंद घ्यावी खऱ्या वास्तवालाच अग्निपरीक्षा असते महाराष्ट्र केसरी च्या यजमानपदाचा मान साताऱ्याला मिळवून देण्याचे श्रेय हे प्राध्यापक दिलीप पवार उर्फ दिलीप बाप्पू यांचे आहे ते त्यांना मिळवायला हवे मात्र दिलीप बापू यांचा स्वभाव हा समन्यायी असल्याने त्यांनी कधीही मानापमान नाट्य च्या फंदात न पडता कुस्तीची परंपरा जिवंत कशी राहील याकरिता अखंड धडपड ठेवली आहे . याउलट कुस्ती परंपरेच्या माध्यमातून कुस्ती परंपरेने इतकेच आपले नाव कसे मोठे होईल राष्ट्रीय नेत्यांबरोबर आपली छायाचित्रे कशी प्रसिद्ध होतील याची तजवीज संयोजकांनी केल्याचे गेल्या चार दिवसाच्या शाहू क्रीडा संकुलातील उत्सवी वातावरणावरून वाटत आहे क्रीडा संकुलाच्या कानाकोपऱ्यांत मध्ये अनेक पैलवानांचे फोटो त्यांच्या स्मृती लागणे गरजेचे होते किंबहुना छत्रपती शाहू क्रीडा संकुल आला पैलवान खाशाबा जाधव नगरी असे नामकरण करणे अधिक सयुक्तिक ठरले असते केवळ शरद पवार यांच्या थेट सूचनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचा संयुक्त सहकार्याचा मोठा वाटा या स्पर्धेमध्ये आहे हे सुद्धा नम्रपणे नमूद व्हायला हवे मात्र या स्पर्धेच्या तयारी मध्ये त्यांच्या सहकार्याचा साधा उल्लेखही करणे संयोजक वारंवार टाळत आहेत जिल्हा क्रीडा समितीचे सचिव जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या कामांमध्ये मोठा वाटा घेतला आणि तो साकारही करून दाखवला प्राध्यापक दिलीप पवार यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या माध्यमातून तब्बल बारा प्रकारची संयोजने यजमानपद तसेच संपूर्ण संघांचे व्यवस्थापन यशस्वीरित्या पार पाडले मात्र त्याचे साधे श्रेय सुद्धा कुठे बोलून दाखवले नाही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ललित लांडगे पत्रकार परिषदेला उपस्थित असताना जिल्हा क्रीडा समितीचे सचिव जिल्हाधिकारी किंवा अध्यक्ष पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून कुस्ती परिषदेची माहिती प्रसारमाध्यमांना येणे अपेक्षित होते मात्र जिल्हा तालीम संघाच्या समन्वयकांना आम्हीच हा घाट घातला हे सांगण्याची घाई झाली होती की काय असा स्पष्ट सवाल जिल्हा जिल्हा तालीम संघाच्या अनेक मान्यवर संचालकांनी विचारला आहे

Adv