Thursday, April 9, 2026
spot_img
Home Maharashtra ऑक्सफर्ड प्रकाशनाने मागितली छत्रपती उदयनराजे यांची माफी

ऑक्सफर्ड प्रकाशनाने मागितली छत्रपती उदयनराजे यांची माफी

73
Adv

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडिया यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची जाहीर माफी मागितली आहे. 2003 साली प्रकाशित झालेल्या Shivaji: Hindu King in Islamic India या पुस्तकातील काही वादग्रस्त मजकुरावरून ही माफी मागण्यात आली आहे.

या पुस्तकाच्या पान क्रमांक 31, 33, 34 आणि 93 वर श्री छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली काही विधाने योग्य पडताळणी न करता प्रकाशित झाल्याचे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने मान्य केले आहे. या विधानांमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याचे स्पष्ट करत प्रकाशन संस्थेने खेद व्यक्त केला आहे.

या विधानांना प्रकाशित केल्याबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटते. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच जनतेला झालेल्या कोणत्याही त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, अशी जाहीर माफी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या नोटिशीद्वारे मागितली आहे.

या घटनेनंतर शिवप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबाबत लेखन करताना अधिक जबाबदारीने आणि संशोधनाधारित भूमिका घ्यावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Adv