
राज्याचे क्रीडा आयुक्त राजेश देशमुख (भा प्र से) यांना सचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी याबाबतचे आदेश आज निर्गमित केले आहेत. पदोन्नती नंतर त्यांची नियुक्ती आहे त्याच पदावर श्रेणी उन्नत करून कायम ठेवण्यात आली आहे.
डॉ. राजेश देशमुख यांनी यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पुणे आणि यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे खाजगी सचिव म्हणून सुद्धा काम त्यांनी पाहिले.
डॉ. राजेश देशमुख अतिशय कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून परिचित असून वेगवेगळ्या पदावर काम करताना त्यांनी आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवला आहे.





