गोरगरिबांवरील त्याचे प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू खा उदयनराजे भोसले यांची साताऱ्याचे आमदार यांचे नाव न घेता टीका

422
Adv

झोपडपट्टी सदृष्य वसाहतीमधील हातावरची पोटं असणा-यांच्या जीवावर उठणा-यांच्या तोंडी, कायापालट करण्याची भाषा पाहून त्यांचे हे प्रेम खरे प्रेम नसून हा ढोंगीपणा आहे. मगरीचे अश्रु आहेत. त्यांचे हे नवीन ढोंग माजगांवकरमाळा वरीलच काय साताऱ्यातील सर्वच झोपडपट्टीसदृष्य वसाहतीमधील नागरीकांनी ओळखले आहे.

सोंग आणि ढोंग करायला फार थोडं डोकं लागतं असे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी याबाबत दिलेल्या पत्रकात पुढे नमुद केले आहे की, सातारा शहरातील माजगांवकरमाळ, लक्ष्मीटेकडी, भिमाबाई आंबेडकरनगर, ४४० सदरबझार, रामाचा गोट, राजलक्ष्मी पिछाडी, अश्या सर्व ठिकाणी हातावरचं पोट असणारी आणि बहुतांशी मजूर कष्टकरी असणारी सर्वसामान्य जनता राहते आज ज्यांनी काही ढोंग केले आहे त्यांचेच सर्वेसर्वा असणारे सर्वशक्तीमान हे तत्कालीन सत्ताधिश असताना माजगांवकरमाळ येथील झोपडया उठवण्या बाबत येथील लोकांना हाकलवून लावण्याबाबत, नगरपरिषदेत
ठराव पारित केला होता. बुलडोझर आणि मशिनरी आणुन येथील लोकांना देशोधडीला लावावचे पूर्ण नियोजन केले होते.
केवळ आम्ही ठामपणे आडवे पडल्यानेच येथील झोपड्या शाबुत राहील्या.ही कायदेशिर कारणाने आम्ही अनुपस्थित होतो त्याकाळात पोलिस लाईनच्या पाठीमागील पंताचा गोट काही भागातील झोपडयांची वस्ती पालिस बंदोबस्तात आणि बळाचा वापर करून, नगरपरिषदेमार्फत हटवण्यात आली होती. येथील लोकांना काही क्षणांत बेघर केले गेले त्यावेळी यांचेच सर्वेसर्वा तत्कालीन नगरपरिषदेत सर्वशक्तीमान सत्ताधिश होते.
झोपडपट्टीसदृप्य वसाहतीमध्ये राहात असले तरी ती सर्व माणसे आहेत, त्यांच्याही भावना आहेत. तसेच ते सर्वसामान्य असले तरी मनाने फार मोठे आहेत अशी माणुसकीची प्रामाणिक भुमिका घेवून माजगांवकरमाळासह भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, २७८ रामाचा गोट आदी ठिकाणी आम्ही पंतप्रधान आवास योजना घरकुलयोजने अंतर्गत किमान मुलभुत सुविधांसह हक्काचे घर उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून केली आहे. सदरचे काम आता टप्यात आले आहे.

याठिकाणी मुलभुत सुविधांसह सर्व नागरी सुविधा देण्यात आल्या आहेत. कोणतीही झोपडी हटवण्याला आम्हीकधीही कारणीभूत राहीलेलो नाही. उलट त्यांना मुलभुत सुविधा सुरक्षितता आम्ही माणुस म्हणून जगण्याचा विश्वास कसा
देता येईल याचीच काळजी आम्ही आजबर करीत आलेलो आहोत. तसेच जेथे त्यांनी ढोंग केले त्या माजगांवकर माळ येथे पीएमआय योजनेअंतर्गत शाहुपूरी पोलिस स्टेशन ते
आकाशवाणी अखेर रस्ता डांबरीकरणाकरीता सुमारे ७५ लाख आणि आकाशवाणी ते महानुभव पंथाचा मठ अखेर रस्त्यासाठी सुमारे रुपये ७५ लाखांच्या डांबरीकरण कामाकरीता सातारा नगरपरिषदेच्या जनरल कौन्सिल ठराव क्रमांक ४२ दिनांक
०३/०९/२०२१ चे ठरावान्वये मंजूरी देण्यात आलेली आहे. याकामांमध्ये करंजे इन्डस्ट्रीयल इस्टेटच्या अंतर्गत रस्त्यांच्या
डांबरीकरणाचाही समावेश आहे. ठराव मंजूरीनंतरचे प्रशासकीय सोपस्कार देखिल पार पडले आहेत. पर्जन्यकाळ संपल्यावर
याकामांना सुरुवात होणार आहे.म्हणूनच संबंधीतांनी कायापालट कशाला म्हणतात हे आधी समजुन घेणे गरजेचे आहे. त्यांच्या या तथाकथित ढोंगी कार्याकडे एक कुतुहल म्हणून बघण्यापलिकडे त्याला फारशी किंमत आहे असे वाटत नाही. यांची श्रेयाचे सॉंग आणि इतर ढोंगं मागे पाहीली आहेत, पुढेही पहायला मिळतील, त्यामुळे मराठी चित्रपटातील प्रसिध्द गाण्याप्रमाणे लबाड लांडगं ढवांग करतय… आत्ता स्वांग… करतंय इतकंच त्याला महत्व आहे. माजगांवकरमाळसह सर्व झोपडपट्टीधारक तर संबंधीतांचे पुतना मावशीचे प्रेम निश्चितच ओळखतील असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.

Adv