शुक्रवार पेठेतील कोटेश्वर मंदिर परिसरात राहणाऱ्या एका युवक अपघातामुळे अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे अशावेळी सातारा पालिकेने या युवकाच्या कुटुंबियांना घराचे अतिक्रमण हटवण्याची नोटीस पाठवून कमालीचा असंवेदनशील पणा दाखवला आहे प्रशासनाच्या या कृतीमुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे या प्रकरणात मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी माणुसकी धर्म म्हणून का होईना थोडी तरी संवेदनशीलता दाखवायला हवी होती अशी अपेक्षा सातारकर व्यक्त करत आहे
या प्रकरणाची माहिती अशी कोटेश्वर मंदिरासमोरील ओढ्या लगत असणाऱ्या जागेमध्ये दीपक गुरव आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या बऱ्याच वर्षापासून राहत आहेत या कुटुंबियांच्या घराच्या शेजारीच एका खाजगी प्लॉटचे विकसन सुरु असून या प्लॉटच्या विकसनाला रस्ता मिळावा म्हणून संबंधितांनी पालिकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून संबंधितांना नोटीस बजावण्याचे उद्योग केल्याची चर्चा आहे . गेल्या बऱ्याच वर्षापासून येथील जागेचा हा वाद न्यायालय मध्ये सुद्धा प्रलंबित आहे हा वाद सामोपचाराने मिटेल अशी अपेक्षा होती मात्र हा वाद कसा चिघळेल याची पूर्ण दक्षता सातारा नगरपालिकेने घेतली आहे .त्यातच दिपक गुरव या युवकाचा काही दिवसापूर्वी अपघात झाल्याने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे गुरव कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती नसल्याने दीपक च्या मित्रांनी लोकवर्गणी गोळा करून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे असे असताना पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या स्वाक्षरीने गुरव कुटुंबीयांना त्यांचे पत्र्याचे शेड त्यांनी हटवावे अशी 52 53 ची नोटीस बजावली आहे .
या नोटिशीचे वृत्त कळताच गुरव कुटुंबियांचे हितचिंतक आणि नातेवाईक यांनी पालिका प्रशासनाच्या या संवेदनाशून्य कारभाराविषयी विषयी प्रचंड संताप व्यक्त केला आहे साताऱ्यात विविध ठिकाणी अतिक्रमणे बोकाळलेली असताना एखाद्या गरीब गरजू कुटुंबाच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचे उद्योग पालिका प्रशासन का करत आहे ? असा संतप्त सवाल गुरव कुटुंबियांनी विचारला आहे एकीकडे दीपक मृत्यूशी हॉस्पिटलमध्ये झुंज घेत असताना दुसरीकडे प्रशासन दीपकच्या कुटुंबीयांना बेघर करण्याच्या प्रयत्नात आहे हा घोर अन्याय सुरू असताना याविषयी कोणीच बोलायला तयार नाही .खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साताऱ्यात असते तर या प्रश्नाची जाग्यावरच तड लागली असती मात्र सातारा पालिका आपल्या अतिक्रमण हटविण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याने गुरुव कुटुंबीयांमध्ये संतप्त वातावरण आहे सातारकरांनी माझ्यासारख्या गरजू महिलेला न्याय द्यावा असा आर्त टाहो दीपक गुरव च्या आई ने फोडला आहे सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट हे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी समजले जातात मात्र या प्रकरणात त्यांनी बोथट संवेदनांचे प्रदर्शन केल्यामुळे त्यांच्या कारभाराविषयी सुद्धा संताप व्यक्त होत आहे साताऱ्यात बहुतांश ठिकाणी धनदांडग्यांचे अतिक्रमण बोकाळलेली असताना तिथे मात्र कायद्याचा धाक दाखवला जात नाही आणि एखाद्या गरीबाची टपरी अथवा पत्र्याचे शेड उभे राहिले त्यावर मात्र कारवाईचा हातोडा उपसला जातो हा दुटप्पी न्याय कशासाठी या प्रश्नावर लवकरच मुख्याधिकाऱ्यांना नागरिक घेराव घालणार असल्याची चर्चा आहे