Thursday, April 2, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City युवा महिला Hockey संघाची विजयाची हॅटट्रिक

युवा महिला Hockey संघाची विजयाची हॅटट्रिक

182
Adv

भारताच्या युवा महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात यशस्वी कामगिरीच सातत्य राखले आहे. या संघाने यजमान दक्षिण आफ्रिका संघाचा सलग तिसरा पराभव केला.

पहिले दोन सामने थाटात जिंकलेल्या भारतीय संघाने अखेरचा तिसरा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 अशा फरकाने जिंकला. भारतीय संघाचा हा दक्षिण आफ्रिका दौरा आगामी काळात होत असलेल्या 21 वर्षाखालील महिलांच्या हॉकी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 पेक्षा जास्त गोलने पराभव केला व आपले निर्विवाद वर्चस्व राखले.

Adv