खा श्री छ उदयनराजे म्हणजे युवा दिलों की धडकन युवा नेते संग्राम बर्गे

191
Adv

छत्रपती शिवरायांचे थेट वारसदार असलेले खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणजे युवा दिलोंकी धडकन. त्यांचा करिष्मा सार्‍यांनाच मोहवून टाकणारा. वाढदिनी त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देताना अनेक किस्से समोर येतात. खासदार म्हणून काम करत असताना विविध विकासकामांचा पाठपुरावा करताना त्यांनी आम जनतेसाठी खाल्लेल्या खस्ता मी जवळून पाहिल्या आहेत. पक्ष कोणताही असो उदयनराजेंची नियत साफ असते. राष्ट्रवादी असो की भाजपा जनतेशी असलेली बांधिलकी त्यांनी कायमच जपली आहे.
खा. उदयनराजेंच्या वाटचालीचा साक्षीदार म्हणून त्यांच्या नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा अभिमान जसा जनतेला आहे तसाच तो मलाही आहे. राजे, लोकांच्या कल्याणासाठी कोणालाही अंगावर घेण्याची तुमची धमक मी जवळून पाहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा हा लोकराजा आहे. छत्रपती शिवराय यांच्या आभाळाएवढया कार्यकर्तृत्वामुळे खा. उदयनराजे यांची प्रत्येक गोष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली जाते. कुणीही काळाचा आणि परिस्थितीचा संदर्भ पहात नाही. सोशल मीडियामधील ट्वीटर, फेसबुक, यु टयुब, वॉटसअप, ई.मेल यापैकी काहीही स्वतः फारसे न वापरणारे, परंतु सर्वांत जास्त चर्चेत असलेले व्यक्तीमत्व म्हणजे उदयनराजे. त्यांच्या एका बाईटने, शब्दाने किंवा अस्तित्वाने, सामाजिक अशांततेचे रुपांतर, शांततेत होते. त्यांची प्रत्येक मुव्हमेंट बातमीचा विषय ठरत असते. अत्यंत प्रेमळ पण अन्याय दिसताच लालबुंद होणारे हे व्यक्तीमत्व. अशा या आमच्या राजासाठी कितीही लाठ्या-काठ्या झेलण्याची आमच्यासारख्या हजारो मावळ्यांची तयारी आहे.
सातारच्या या ऐतिहासिक भूमीत राजेंच्या रुपात एक धडाडीचे नेतृत्व लाभले. स्पष्ट व परखड भूमिका घेणारा हा जाणता राजा नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या न्यायी प्रश्नासाठी पुढाकार घेत असल्याचा मी साक्षीदार आहे. समाजकारणातून राजकारण आणि राजकारणातून सत्ता संपत्ती अशी समीकरणे निर्माण करणार्‍या ढोंगी, मतलबी सत्ताधिशांना वेसन घालण्याची धमक फक्त उदयनराजेंच्या नेतृत्वातच आहे. जनमानसातील या जाणत्या राजाला गोरगरीब व दिनदुबळ्या समाजाची खरी दु:खे माहित आहेत. स्वत:ला जनतेचा सेवक म्हणून काम करणारा असा राजा निराळाच म्हणावा लागेल.
आजपर्यंतच्या वाटचालीत त्यांनी अनेक चढउतार पाहिले. राजकीय प्रवासात पदाचा मोह त्यांनी कधीही ठेवला नाही. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिल्याने ते सामान्यांमध्येच जास्त रमलेले दिसतात. अलिशान बंगल्यात, राजवाड्यात बालपण घालवलेले उदयनराजे जेव्हा शहरात फिरतात तेव्हा त्यांच्यासाठी कोणी लहान, कोणी मोठा रहात नाही. जनतेपेक्षा ते स्वत:ला वेगळे मानत नसल्यानेच जनता त्यांच्या प्रेमात पडत असते. कामाचा धडाका, प्रश्न समजावून घेण्याची वृत्ती यामुळे त्यांच्या स्वभावातील अभ्यासूपणा दिसून येतो. कार्यकर्त्याच्या अडीचणीवेळी धावून जाणे हा त्यांचा स्वभाव आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवून ते आपल्या मनाचा मोठेपणा वारंवार दाखवून देतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा हा लोकराजा एक दिवस या अखंड हिंदुस्थानचा सरताज बनावा, ही तमाम जनतेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना!
– संग्राम बर्गे

Adv