यादोगोपाळ पेठेतील सर्वे नंबर 134 व 134 अ येथे मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना इमारत उभारण्यात येणार असल्याची माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली या प्रकल्पासाठी वीस लाख रुपये निधी मंजूर झाला असून आरक्षण क्रमांक 42 मध्ये 15 गुंठे जागा येथे उपलब्ध आहे हा प्रकल्प लवकरच मार्गी लावला जाईल असे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे
येथील मालशे पुलाच्या कामासंदर्भात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली त्यावेळी या प्रकल्पाची सुद्धा माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली प्रसिद्धीपत्रकात खासदार उदयनराजे भोसले पुढे म्हणतात ऐतिहासिक सातारा जिल्हा शांतताप्रिय व सामाजिक सलोखा राखणारा जिल्हा आहे . खऱ्या अर्थाने सर्व धर्मांचा आदर या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक करत आलेला आहे .सातारा शहरात सर्वसामान्य मुस्लिम समुदायातील नागरिकांच्या विवाहासाठी आजपर्यंत हक्काचे ठिकाण नव्हते म्हणून अल्पसंख्यांक विकास विभागाकडे स्वतः खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठपुरावा केला होता शादीखाना इमारतीसाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून याची लवकरच निविदा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत .याचे स्पष्ट आदेश उदयनराजे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दिले आहेत येथील 15 गुंठे जागेवर शादीखान्याची देखणी इमारत सुसज्ज सुविधांनी उभी राहणार आहे या इमारती मध्ये चेंजिंग रूम, महिलांसाठी स्वतंत्र गॅलरी, बैठक व्यवस्था, एक मोठा हॉल, भटारखाना व वायुविजनाची स्वतंत्र व्यवस्था अशा सुविधा देण्यात येणार आहे
सदरचे बांधकाम दर्जेदार व नियोजनपूर्वक झाले पाहिजे व शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करण्यात यावे अशा स्पष्ट सूचना उदयनराजे भोसले यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट व बांधकाम अभियंता दिलीप चिद्रे यांना केल्या आहेत