यादोगोपाळ पेठेतील छ प्रतापसिंह महाराज उद्यानाचे फुकटचे श्रेय कोणी घेऊ नये

461
Adv

यादोगोपाळ पेठेतील सिटी सर्वे नंबर 134 व 134 अ येथे तब्बल 50 गुंठे क्षेत्रात विकसित होणाऱ्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज उद्यान विकासाचे श्रेय कोणी घेऊ नये कोणी तसा प्रयत्न केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा थेट इशारा माजी नगरसेविका दीपाली राजू गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिला

काही दिवसांपूर्वी याच उद्यानाचे भूमिपूजन आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले येथील भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या पाठपुराव्याने हे उद्घाटन दुसऱ्यांदा झाल्याने उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती तोच मुद्दा पकडून या संदर्भातील कागदपत्रांच्या पुराव्यासह दीपाली गोडसे प्रसारमाध्यमांसमोर हजर झाल्या आणि गेल्या दहा वर्षापासून केलेल्या प्रयत्नांची वस्तुस्थिती त्यांनी पत्रकारांसमोर मांडली

दीपाली गोडसे पुढे म्हणाल्या 2006 सालापासून मी साताऱ्याच्या समाज कारणांमध्ये सक्रिय आहे यादो गोपाळ पेठेतील 75 गुंठे जागा देखभालीअभावी बरीच वर्ष तशीच पडून होती 2008 मध्ये पहिल्यांदा नगरपालिकेचा ठराव करून त्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडे तब्बल चार वर्ष पाठपुरावा केल्यानंतर ती जागा जिल्हाधिकाऱ्यांनी विनामोबदला नगरपालिकेच्या ताब्यात दिली . या जागेवर सुसज्ज असे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज उद्यान विकसित करण्याचे नियोजन झाले होते मात्र या उद्यानावर सातारा शहरातील मुस्लिम समाजाने हक्क सांगून औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाकडे याचिका दाखल केली औरंगाबाद हायकोर्ट आणि व वक्‍फ महामंडळ यांच्याकडे तब्बल सात वर्ष कायदेशीर लढाई लढून या जागेचा ताबा आम्ही मिळवला आहे नूर कब्रस्तान मंडळाशी झालेला करारनामा सुद्धा कागदोपत्री उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले . यासंदर्भातील तडजोड नामा औरंगाबाद हायकोर्टात सादर करण्यात आला असून येथे मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना तसेच गार्डन विकसन आणि लगेच संरक्षक भिंत असे विविध विकास कामांचे नियोजन ठरले आहे यासंदर्भात या उद्यान साठी तीन कोटी 48 लाख रुपयांचा निधी खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला होता मात्र करोनाच्या संक्रमित काळामुळे हा निधी गोठवण्यात आला जिल्हा नियोजन समितीतून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी पुन्हा पत्र देऊन या संदर्भात दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे मात्र पालिकेने या या संदर्भातील केवळ संरक्षक भिंतीचे काम पूर्ण केलेले आहे

असे असताना ज्यांनी पाच वर्षात बोर्डात काहीच केले नाही अशांनी जनतेसमोर जाण्यासाठी पुन्हा त्याच उद्घाटनाचा घाट घालत सातारकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे या उद्यानाच्या कामाचे फुकटचे श्रेय कोणी लाटू नये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विषयी आम्हाला प्रचंड आदर आहे मात्र त्यांना चुकीची माहिती देऊन त्यांच्या माध्यमातून हे उद्घाटन करण्यात आलेले आहे हे अत्यंत चुकीचे आहे या भूमिपूजन प्रसंगी लावण्यात आलेल्या जाहिरात फलकावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचे छायाचित्र होते त्यांचा या कामाशी काहीही संबंध नाही जनतेसाठी काही कामच केलेले नसल्यामुळे दुसऱ्याच या कामाचे श्रेय लाटण्याचा होणारा प्रयत्न हा हास्यास्पद असल्याची टीका दीपाली गोडसे यांनी केली जर या संदर्भात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या काही लोकांनी यांची हाकाटी पिटली आहे ती अत्यंत तकलादू व खोटी असल्याचे राजू गोडसे यांनी पत्रकारांना सांगितले

Adv