मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे सुशांत मोरे

254
Adv

जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभार बाबत माने जिल्हाधिकारी यांनी संचालक आरोग्य विभाग मुंबई यांना चौकशीचे आदेश देणे कामी कारवाई करावी असे पत्र दिले आहेत अनधिकृत व बेकायदेशीर दारू दुकाने व विक्री प्रकरणी माननीय जिल्हाधिकारी यांनी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी सातारा यांना चौकशीचे आदेश दिले गेल्याने उपोषण मागे घेत असल्याची माहिती सुशांत मोरे यांनी दिली

पृथ्वी डेवलपर्स आंबेकर यांनी रस्त्यावर बांधलेली अनधिकृत भिंती बाबत सहायक संचालक नगररचना सातारा नगरपरिषद यांना जागेवर जाऊन पाहणी करून चौकशीचे आदेश मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिले आहेत सानप हद्दीतील पेठ गुरुवार पेठ रविवार येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी जागेवर जाऊन पाहणी करून नोटिसा व शास्तीची आकारणी करावी असे आदेश अतिक्रमण विभागाला मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिले आहेतआरटीओ कार्यालयातील झुणका भाकर केंद्र सील करण्याचे आदेश माने तहसीलदार यांनी पोलीस बंदोबस्तात करण्याचे आदेश पुरवठा विभागाला दिले आहेत तसेच फुटपाथवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई नगर पालिके मार्फत सुरू आहे

आयोध्या नगरी मलकापूर नगरपालिकेतील रस्ता खुला करणे बाबत मुख्याधिकार्‍यांनी जागेवर जाऊन पाहणी करून अतिक्रमण काढून रस्ता खुला करावा असे आदेश जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांनी मुख्याधिकारी मलकापूर नगर परीक्षेत कराड यांना दिले आहेत भाडळे तालुका कोरेगाव येथील रस्ता खुला करणेकामी ग्रामसेवक यांनी कारवाई करावी असे आदेश गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरेगाव यांनी दिले आहेत

ग्रामपंचायत वेळे तालुका सातारा येथील अनधिकृत बांधकाम नोटीस देऊन कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकारी सातारा यांनी दिले आहे
वरील सर्व उपोषण बाबत कारवाई ची पत्रे आणि समक्ष अधिकारी यांनी येऊन आश्वासन दिलेमुळे आज रात्री 7.35 मिनिट वेळी जिल्हा प्रशासन अधिकारी श्री अभिजित बापट, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी उपनगराध्क्ष शंकर माळवदे , पोलिस अधिकारी यांचे उपथिथतीत उपोषण लिंबू सरबत घेऊन मागे घेतले

Adv