उत्तर कोरेगावं तालुक्यात मटका जोमात*

365
Adv

पिंपोडे बुद्रुक-प्रतिनिधी
उत्तर कोरेगावं तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक आणि वाठार स्टेशन मध्ये मटका घेणारे सध्या मोकाट असून उत्तर भागात मटकाबुकींनी उच्छाद मांडला आहे . या अवैध धंदेवाल्यांना कोरोना नियमावलीतुन सूट आहे का ? नक्की कुणाचे सेटींग बिघडलय ? अशा चर्चा नागरिकांच्या सुरु आहेत . कोरोना काळात सगळे व्यवसाय थंड असताना जुगार आणि मटका खेळणारे , घेणारे मात्र तेजीत असल्याचे दिसत आहे . सर्वसामान्यांचा आरोग्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु असताना हा सगळा प्रकार बिनबोभाट सुरु असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे .

उत्तर कोरेगावं तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक आणि वाठार स्टेशन मध्ये मटक्याला चांगले दिवस आलेत की काय ? अशी शंका नागरिकांच्यातुन व्यक्त होत आहे .. या अगोदर देखील चोरुन मटका सुरु होता . परंतु , अचानक उत्तर भागात पानटपऱ्या , आडोशाला गर्दी करुन मटक्याचा अभ्यास सुरु असल्याने कायदा सुव्यवस्थेच्या नावानं शिमगा सुरु असल्याचे बोलले जात आहे . अचानक मटका बुकींची वाढलेली संख्या उत्तर भागातील पिंपोडे बुद्रुक आणि वाठार स्टेशन मध्ये दोन अवैध धंदेवाल्यांच्यातील स्पर्धा असल्याचे समजते . या भागात मोठ्या प्रमाणावर मटक्याची उलाढाल सुरु असून यांना नक्की अभय कुणाचे ? पोलिसांना याबाबत माहित नाही का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत

Adv