टपाल कार्यालयाच्या इमारत नूतनीकरणासाठी १ कोटी ९ लाख रुपयांचा निधी मंजूर

323
Adv

केंद्रीय मंत्री ना.अश्विनी वैष्णव यांच्या माध्यमातून सातारा जिल्हयातील पोस्ट ऑफिस मुख्यालयाच्या नुतनीकरणाच्या रुपये 1कोटी 9 लाख 76 हजार 72 रुपयांच्या विविध कामांना मंजूरी मिळाली आहे.या निधीमधुन,सातारा पोस्ट ऑफिसच्या मुख्य इमारतीचे नुतनीकरणाची कामे करण्यात येत आहे नुतनीकरणानंतर,पोस्ट ऑफिसच्या इमारत लोकसेवा करण्यासाठी अधिक सुविधाजनक होईल अशी माहीती खा छ उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

केंद्रशासनाच्या अखत्यारित पोस्ट खाते येते.या खात्यामुळे माणसांची मने जोडण्याचे काम स्थापनेपासून होत असून, सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनामध्ये पोस्ट कार्यालयांचे अनन्यसाधारण महत्व आहे.आता पोस्ट विभागामार्फत बॅन्कांचे कार्य देखिल चालु असल्याने,पोस्ट खात्यात जेष्ठ नागरीकांसह
सर्वसामान्य व्यक्तींचा वावर वाढला आहे. सातारा पोस्ट ऑफिसच्या मुख्यालयाची इमारत अत्यंत जुनी आहे.सुमारे 40-50 वर्षापूवी बांधलेल्या या इमारतीचा आजपर्यंत अत्यंत चागला उपयोग झाला आहे.तथापि याइमारतीचे नुतनीकरण करणे अत्यंत आवश्यक होते. या सर्व बाबींचा विचार करुन, सातारा पोस्ट ऑफिसचेमुख्यालय असलेली सातारा पोवईनाका येथील इमारतीचे नुतनीकरण करण्याचा प्रस्ताव देण्याबाबत आम्ही
सिनिअर सुप्रीन्टेडंन्ट यांना सूचना केली होती. तसेच या बाबतीत ना.अश्विनी वैष्णव यांच्याकडे देखीलआम्ही पाठपुरवठा केला होता. त्यानुसार सादर केलेल्या प्रस्तावातील प्रस्तावित बाबींना ना.अश्विनी वैष्णवयांच्या मंत्रालयाकडून मंजूरी मिळालेली आहे.त्यानुसार पोस्ट ऑफिसच्या पहिल्या मजल्यावरील इलेक्टीफिकेशनचे नुतनीकरण करणे आणीएमव्ही पॅनेल उभारण्यासाठी रुपये 14 लाख 87 हजार रुपये मंजूर करण्यात आले असून, इलेक्ट्रीफिकेशनचेनुतनीकरण करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.एमव्ही पॅनेल बसवण्याचे काम प्रगती पथावर आहे.तसेच इमारतीच्या तळमजल्याचे इलेक्ट्री फिकेशनचे नुतनीकरण आणि संरक्षक भिंतीवर प्रकाशयोजना याकामासाठी रुपये 19 लाख 90 हजार रुपये मंजूर झाले आहेत. सदरचे काम सुरु आहे. त्याचप्रमाणेपोस्ट ऑफिसच्या दर्शनी भागातील रॅम्पची दुरुस्ती, पासपोर्ट ऑफिस शेजारी लेडीज टॉयलेट उभारणे, याकामांसाठी सुमारे रुपये 20 लाख रुपये मंजूर असून, सदरची कामे प्रगतीपथावर आहेत.पोस्ट मुख्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी रुपये 44 लाख 97 हजार रुपयेआणि आरएमएस सॉर्टिंग ऑफिसचे देखभाल दुरुस्तीसाठी रुपये 10 लाख मंजूर होवून उपलब्ध झाले आहेत.सदरची दोन्ही देखभाल दुरुस्तीचे कामे सुरु असून प्रगतीपथावर आहेत.या सर्व कामांना एकूण रुपये 1 कोटी 9 लाख 76 हजार 72 रुपयांचा निधी मंजूर झाला असून,
सातारा येथील पोस्ट मुख्यालयाची इमारत नुतनीकरण झाल्यावर नागरीकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा सुविधा गतीमानतेने पुरवता येणार आहे असेही खा छ उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

Adv