स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर करणारे कुशल प्रशासक, शंभू पुत्र

287
Adv

स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर करणारे कुशल प्रशासक, शंभू पुत्र , सातारा शहर संस्थापक छत्रपती थोरले शाहु महाराज यांचे जयंती निमित्त श्री. छ. वृषालीराजे भोसले अध्यक्षा शाहुनगरी फाउंडेशन, मा उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक श्री सुहास राजेशिर्के, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, नगरसेवक अशोक मोने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारचे अधीक्षक श्री प्रवीण शिंदे तसेच सातारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी नभूतो अशी भव्य छत्रपती शाहूमहाराज यांची पालखी मिरवणूक संपूर्ण शहरात काढण्यात आली.

छत्रपतींचे निवासस्थान असलेल्या अदालत राजवाडा येथे छत्रपती परिवाराच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. मिरवणुकी मध्ये साहसी खेळांचे प्रत्यक्षित चौका चौकात दाखवण्यात आले. संपूर्ण मिरवणुकी मध्ये स्वतः छत्रपती वृषालीराजे सुरुवाती पासूनच पायी सहभागी झाल्यामुळे शिवशाहू भक्तांचा उत्साह द्विगुणित झाला होता. मिरवणूक अदालत राजवाडा, समर्थ मंदिर, राजवाडा मोती चौक कमानी हौद मार्गे पुन्हा तख्त वाडा (गुरुवार बाग) येथे आल्या नंतर छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्या आणि समस्त सातारकरांच्या उपस्थिती मध्ये शाहू महाराजांच्या मूर्तीस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भव्य रक्तदान शिबिराचा वृषालीराजे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. दिवस भरात युवकांचा मोठा प्रतिसाद या शिबिरास मिळाला. प्रास्ताविक श्री निलेश झोरे यांनी केले. आभार श्री गणेश दुबळे यांनी मानले. कार्यक्रमास कोविड काळात उत्तुंग कार्य केलेल्या वीरांचा सन्मान शाहू नगरी फौंडेशन च्या वतीने करण्यात आला.

Adv