जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनेकांनी केलेल्या अनाधिकृत केलेली तब्बल १३ प्रकरणे उघडकीस आली आहेत.संबंधित प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, यासाठी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उपोषण सुरू केले होते.याबाबत सर्व संबंधित विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उपोषणाला स्थगिती देण्याची निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ते तात्पुरते स्थगित केले असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले.
जिल्ह्यात काही शासकीय अधिकारी, कर्मचारी आर्थिक वरकमाई करण्यासाठी गुपचूपपणे अनाधिकृत कामे करत असतात. अशी प्रकरणे उघडकीस येऊ नये,याची खबरदारी घेतात.मात्र जनमाहिती अधिकारीतून मिळालेल्या माहितीवरून काही जण कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.अशा तब्बल १३ प्रकरणाचा पोलखोल होऊन तक्रारी केल्या तरी कारवाई केली जात नसल्याने सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या इशाऱ्यानंतर १ मे रोजी सकाळी 7 वाजलेपासून महाराष्ट्र दिनाच्या दिवशी उपोषण सुरू केले होते.
यातील वाई येथील जनता अर्बन को-ऑप बॅंकेतील अधिकाऱ्यांनी प्रकाश रामचंद्र भोसले यांची बिनशेती नसलेली,बोगस फेरफार नोंद असणाऱ्या स्थावर मालमत्तेला कर्ज देऊन स्वतः ची फसवणूक करून घेतली होती.त्यात बनावट तहसिलदारांची सही, शिक्के, ले आऊट, नकाशा तयार करून अनाधिकृतपणे मालमत्ता असून ही त्याचा लिलाव करत मिलिंद आणि विजय बलकवडे यांची फसवणूक केली आहे.संबंधित प्रकरणाचे पुरावे देऊन ही चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.त्याला प्रतिसाद दिला जात नाही.
पुनर्वसन झालेल्या भिवडी ता.कोरेगाव गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम पुर्ण न करताच ठेकेदाराला अधिकाऱ्यांनी बीले अदा केली आहेत. याकामी कार्यकारी अभियत्यांनी 30 दिवसाचे आत कारवाई करू आणि उर्वरित काम पूर्ण करू असे आश्वासन आज लेखी दिले आहे.
जिल्ह्यात वणवा रोखण्यात अपयश आणि वणवा लावणाऱ्यांच्यावर कठोर कारवाईत दिरंगाई करणाऱ्या वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई केली जात नाही.याबाबत सह.उप वन संवरक्षक झांजूर्णे साहेब यांनी लेखी आश्वासन दिले आहे.
महाबळेश्वर तालुक्यात इको सेन्सिटिव्ह झोन असताना ही पारुट गावातील सर्व्हे नंबर २९/४ इ मधील सचिन मनसुखलाल बराई यांनी अनाधिकृतपणे विहीर खुदाई आणि केलेल्या बांधकामाचा पंचनामा करून ही कारवाई केली जात नाही. कोट्रोशी येथील सर्व्हे नंबर ६६ मध्ये गौरव लक्ष्मीकांत रुद्रकंठवार यांच्या सह अन्य व्यक्तींनी अनाधिकृत ५ इमारतींचे बांधकाम करून ही वाई विभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. तर याच गावातील सर्व्हे नंबर ६४/१२ मधील शेत जमीनीवर कोणतीही परवानगी नसताना बाबूराव अर्जुन कदम यांनी ३ मजली बंगल्याचे बांधकाम सुरू केले आहे. त्याची पुराव्यानिशी माहिती सादर करुन ही तहसिलदारांनी कारवाई केली नाही. नाकिंदा येथील गट नंबर २७/५ मधील शेत जमीनीवर माजी विभागीय आयुक्तांनी पत्नी शुभांगी रमेश देवकर यांच्या नावे अधिकाराचा गैरवापर करून टोलेजंग बंगला बांधला आहे.त्याला कोणत्या ही परवानग्या नसल्याने पुरावे सादर करुन कारवाई केलेली नाही. भेकवली येथील गट नंबर ९/१ मध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना सागर दत्तात्रय डोईफोडे यांनी अनाधिकृतपणे अलिशान बंगला उभारला असून ही याविरोधात पुरावे देऊन तक्रार करून ही कारवाई केली जात नाही. भिलार येथील सर्व्हे नंबर ३३/३३ मध्ये शासकीय निधीतून साकारलेल्या पाझर तलावाच्या भिंतीला खेटून अनाधिकृत बांधकामांची तक्रार करून ही कारवाई केली जात नाही.
भोसे गावात सर्व्हे नंबर ३६/बंद/४२ बंद/ प्लॉट नंबर ५ मध्ये स्नेहल सिध्दार्थ तागडे या महिलेने अनाधिकृत बांधकाम आणि मंचरजी बाटलीवाला व इतरांनी सर्व्हे नंबर ४०/२ येथे शेतजमिनीत ग्रामपंचायत सह अन्य कोणत्याही परवानगी नसताना अनाधिकृतपणे दारु विक्री करणारा बार सुरू केल्या प्रकरणी सुध्दा तक्रार दाखल केली असताना कारवाई केली जात नाही.
महाबळेश्वर नगरपालिकेच्या हद्दीत अनाधिकृतपणे केलेली बांधकाम केल्याची पुरावे सादर करून कारवाई केली जात नाही. याप्रकरणी जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट साहेब यांनी मुख्याधिकारी यांना नोटीस देऊन कारवाई करणेची सूचना केली आहे.
क्षेत्र महाबळेश्वर येथे गट नंबर १२०/१अ/१/१ अ मध्ये प्रितमदास टिकमकदास गेरा यांनी बेकायदेशीरपणे बिनशेती न करता, महसूल विभाग आणि टिपीची परवानगी नसताना,ले आऊट तयार करून प्रकरण चौकशी करावी.यात प्रांताधिकारी, तहसिलदार, अनेक कर्मचारी गुंतलेले असून सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी यांच्याकडून दिली असल्याचे…. यांनी सांगितल्यानंतर सुशांत मोरे यांनी उपोषण काही दिवसांसाठी स्थगिती देत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
चौकट-१
*पालकमंत्र्यांच्या तालुक्यातील घोट गावात घोळ*
“पाटण तालुक्यातील घोट येथे ग्रामसेवक वाल्मीक लोखंडे आणि माजी सरपंच मधुकर आरेकर यांनी खरेदी केलेले निकृष्ट व जादा दराचे साहित्य याची चौकशी करणेकामी गट विकास अधिकारी आणि उप मुख्य अधिकारी ग्रामपंचायत हे टाळाटाळ करतात. जिल्ह्याचा देशात विकास कार्यातून डंका वाजतो. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यपद्धतीने हाच डंका सध्या वाजत नाही. ग्रामपंचायतीशी संबंधित अधिकाऱ्यांना वरकमाईच्या संसर्गाची चांगलीच लागण झाल्याने ओवाळणीचे आकडे वाढले आहेत. राज्यात आपल्या हटके स्टाईलने दबदबा निर्माण करणाऱ्या पालकमंत्र्यांच्या तालुक्यात तक्रारी होऊन ही जिल्हा परिषदेचे अधिकारी दुर्लक्ष करत असून ते कारवाई ही करत नसल्याने भ्रष्टाचार वाढला तर नाही ना. पालकमंत्र्यांनी आपल्या होम ग्राऊंडवरील अशा प्रकरणाकडे लक्ष द्यावे,”अशी अपेक्षा सुशांत मोरे यांनी व्यक्त केली.
चौकट -२
कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
महाबळेश्वर तालुक्यातील अनाधिकृत बांधकामे पाडण्यात दिरंगाई केल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला न्यायालयात आव्हान देणार आहे. कारवाईचा अधिकार असून ही कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सांगितले.






