शिवप्रभुंचा सातरस्ता पोवईनाका येथे असलेले पूर्णाकृती पुतळारुपी शिवस्मारक सर्वांचे प्रेरणास्थान आहे. सदरचे प्रेरणास्थान कायम शिवस्मारक म्हणूनच राहणे आवश्यक आहे. शिवप्रभुंपेक्षा दिगंत किर्तीचे कोणी होईल किंवा कोणी असेल असे वाटत नाही. याठिकाणी अन्य कोणाच्या नावाने काही करण्याचे कोणी धाडस करु नये.अधिकार गाजवून, तमाम जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा कोणी हिन प्रकार जर करीत असेल तर तो जनतेच्या माध्यमातुन हाणुन पाडला जाईल असा इशारा सातारच्या माजी नगराध्यक्षा सौ. रंजना रावत यांनी व्यक्त केले आहे.
सातरस्ता म्हणून ओळखला जाणारा पोवईनाका परिसर हे सातारा शहराचे नाक आहे. याठिकाणी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे स्मारक आहे.या स्मारकाचे सध्या सर्वांच्या सहकार्याने आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने नगरपरिषदेच्या माध्यमातुन चांगले सुशोभिकरण होत आहे. सातारकरांनाच नव्हे तर येथुन जाणा-या येणा-या सर्वांनाचहा शिवस्मारक परिसर प्रेरणा देणारा आहे. या प्रेरणास्थानाचे ठिकाणी अन्य काही महापुरुषांचे स्मारक किंवा आईसलॅन्ड करण्याचे कोणी घाटत असेल तर जनतेच्या अस्मितेवर तो घाला असेल. स्वराज्याचे शिल्पकार शिवप्रभुंचे कर्तुत्व झाकाळले जाईल असे काही कोणी काही करण्याचा प्रयत्न जरी केला असे प्रयत्न हाणुन पाडले जातील.लोककल्याणकारी शिवप्रभुंची तुलना अन्य कोणाशी हावू शकणार नाहीच आणि तसा प्रयत्न देखिल कोणी करु नये अशी माफक अपेक्षा देखिल सौ. रावत यांनी व्यक्त केली आहे.
राजघराण्याचे जेष्ठ व्यक्तीमत्व राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी आज शिवस्मारक परिसराची पहाणी केली आहे. या ठिकाणी अन्य काही नको अशी प्रामाणिक भावना आणि सर्वसामान्य सातारकरांच्या मनातील भुमिका त्यांनी येथे प्रथमदर्शनी मांडली आहे. तसेच याशिवस्मारक परिसरालगत छत्रपती संभाजी महाराज आणि शाहुनगरीचे संस्थापक, ज्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा आटकेपार झेंडा फडकविण्यात आला त्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या दोनएैतिहासीक व्यक्तीमत्वांची शानदार स्मारके उभारण्याची संकल्पना आहे. आमचा कोणाला विरोध नाही.परंतु या संकल्पित स्मारकांना आणि शिवस्मारकास अडचणीच ठरेल असे कोणतेही कृत्य शिवस्मारक भुमीमध्ये होवू दिले जाणार नाही सौ. रंजना रावत यांनी म्हटले आहे. जिल्हापरिषदेच्या मालकीच्या शिवस्मारक परिसराचे पावित्र्य जतन करण्याचे आणि ते उत्तरोत्तरवर्धिष्णु करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, हीजबाबदारी निश्चितपणे पार पाडतील अशी अपेक्षा आहे. त्यातुनही शिवप्रभुंच्या स्मारकरुपीपराक्रमाचा
अवमान होईल असे कोणतेही कृत्य कोणीही करण्याचा प्रयत्न केला तर सर्व सातारकर एक होवून,हा कुटील प्रयत्न उलथवून लावतील असा विश्वास आहे असेही सौ. रंजना रावत यांनी शेवटी नमुद केले आहे.







