गडकर आळी येथील उपसरपंच राजेंद्र गिरीगोसावी यांच्या प्रभागात आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांच्या सूचनेनुसार सातारा पालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली
हद्दवाडी नंतर शाहूपुरी सह काही भाग सातारा पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर सातारा पालिकेच्या वतीने विविध विकास कामांना सुरुवात झाली असून पालिकेच्या आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांच्या सूचनेनुसार शाहूपुरी येथील उपसरपंच राजेंद्र गिरी गोसावी यांच्या प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी. माजी पंचायत समितीचे सदस्य संजय पाटील, उपसरपंच राजेंद्र गिरी गोसावी, रमेश धुमाळ, अजित ग्रामोपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते
स्वच्छता मोहिमे मध्ये ओढे, नाले ,गटारे यांची स्वच्छता करण्यात सुरुवात झाली असून सातारा पालिका व उपसरपंच राजेंद्र गोसावी यांच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून येणाऱ्या काळात स्वच्छता मोहीम अधिक कशी राबवता येईल हा संकल्प असल्याचे उपसरपंच गोसावी यांनी यावेळी सांगितले