सातारा शहरालगतच्या शाहूनगर या उपनगराची सुविधांच्या संदर्भात शक्य तितकी जबाबदारी उचलणाऱ्या जय सोशल फाउंडेशनचे संस्थापक सागर भोसले यांची सातारा पालिकेच्या आरक्षण सोडती मुळे अडचण झाली आहे . वार्ड क्रमांक 19 मध्ये हा महिला सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित झाल्याने शहराच्या मिनी मंत्रालयात सागर भोसले यांच्या पत्नी हेमलता भोसले यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे शाहूनगरमध्ये श्रीं च्या जोडीला सौ असे समाजकारणाची नवे सूत्र आता पाहायला मिळणार आहे
सातारा शहराची हद्दवाढ होऊन आता सव्वा दोन वर्षे उलटत आली येथील मालमत्तांचे वर्गीकरण होऊन येथे सुविधा येईपर्यंत साडेचार हजार लोकवस्तीच्या या भागाला पदरमोड अथवा लोकवर्गणीचा आसरा घ्यावा लागत होता . या अडचणी लक्षात घेऊन जय सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक सागर भोसले यांनी सार्वजनिक सुविधांच्या संदर्भात चांगलाच पुढाकार घेतला होता शाहूनगर परिसरामध्ये सार्वजनिक बागांच्या सुविधा, रस्त्यांची मोजमापे, पाणीपुरवठ्याच्या सुविधा, रस्त्यांची दुरुस्ती, सीसीटीव्ही ची उभारणी असे विविध उपक्रम गेल्या वर्षभरामध्ये जय सोशल फाउंडेशन यांनी राबवले होते या भागातील सुमारे 25 ते 30 सोसायट्यांमध्ये जय सोशल फाउंडेशन आणि सागर भोसले हेच नाव सर्वतोमुखी झाले होते या भागात दिलेल्या साधन सुविधा आणि उभारलेले विकास कामांचे जाळे याची पाहणी दस्तुरखुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा करत सागर भोसले यांना चांगले पाठबळ दिले
गुरुवारी झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये वार्ड क्रमांक 19 प्रभाग ओबीसी सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला असा आरक्षित झाल्याने सागर भोसले यांची पालिकेत प्रतिनिधित्व करण्याची अडचण झाली आहे मात्र सर्वसाधारण महिला गटातून सागर भोसले यांच्या सुविद्य पत्नी हेमलता भोसले यांना संधी मिळू शकते अशी राजकीय शक्यता नव्हे तर सागर भोसले समर्थकांना खात्री आहे . उदयनराजे महिला शक्तीचा नेहमीच सन्मान करतात आणि हे समीकरण जुळवून आणण्यासाठी स्वतः सागर भोसले समर्थक तयारीला लागले आहेत
जय सोशल फाउंडेशन ने शाहूनगर परिसरामध्ये तीन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा परिसर निर्धास्त केला आहे तसेच येथील अजिंक्यतारा रिक्षा स्टॉप चौक ते जगताप वाडी या भागांमध्ये एलईडी डीजे बसून हा परिसर प्रकाश मानही करण्यात आला आहे शाहूनगर परिसराची जबाबदारी श्रींच्या बरोबरीने सौ सुध्दा सांभाळणार असल्याची चर्चा आहे . सागर भोसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी हेमलता भोसले ही जोडगोळी शाहू नगरच्या समाजकारणात यापुढे सातत्याने दिसणार आहे पालिकेमध्ये जनतेसाठी काम करणारी माणसे पोहोचावीत आणि त्या माध्यमातून शाहूनगर परिसराचा विकास व्हावा हीच समस्त शाहूनगर वास यांची इच्छा असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत





