छ उदयनराजे शाहूपुरी मध्ये साकारणार क्रीडा संकुल उपाध्यक्ष शेंडे व उपसरपंच गोसावी यांची माहिती

520
Adv

सातारा नगरपरिषदेची हद्दवाढ झाली आणि आदर्श काॅलनी जवळील नगरपरिषदेच्या मालकीच्या कचरा डेपोसाठी गेले कित्येक वर्षे आरक्षित असलेल्या जागेवर आता काय होणार याबद्दल अफवांना उत आला, होता आता त्याच जागेवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे क्रीडा संकुल उभे करणार असल्याची माहिती सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व शाहूपुरी चे उपसरपंच राजेंद्र गिरीगोसावी यांनी सातारानामा शी बोलताना सांगितले
हद्दवाढ झाल्यानंतर सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री मनोज शेंडे, माजी सरपंच श्री गणेश आरडे, माजी उपसरपंच श्री राजेंद्र गिरी, श्री मंदार पुरोहित, श्री अमित कुलकर्णी, श्री रमेश धुमाळ, श्री अजित ग्रामोपाध्ये यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांची भेट घेऊन त्या जागेवर सर्वांना उपयोगी असा एखादा उपक्रम राबवावा अशी मागणी केली. होती आता ती साकारणार असल्याने शाहुपुरी मध्ये राहणारे नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून या निर्णयाबद्दल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे आभार मानले आहेत
सर्व वयोगटातील लोकांना उपयोगी असा काय उपक्रम राबवता येईल यावर चर्चा करताना पुर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात असताना जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून या भागात अंदाजे चार पाच एकर जागेची मागणी क्रिडा अधिकार्यांनी केली होती ही बाब श्री संजय पाटील यांनी निदर्शनास आणून दिली त्यावेळी खासदार उदयनराजे यांनी तातडीने याबाबत क्रिडा अधिकार्यांशी चर्चा करून याविषयी विचारणा केली आणि क्रिडा अधिकार्यांनी क्रिडा संकुलासाठी जागेची गरज आहे असे सांगितल्यावर *खासदार उदयनराजे यांनी माननीय पंतप्रधान श्री मोदींच्या फिट इंडिया मुव्हमेंट साठी या जागेवर क्रिडा संकुल उभे करा* पाहिजे ते सहकार्य मी करतो असे सांगितले त्यामुळे आता आपल्या भागात स्टेडियम, इनडोअर स्टेडियम, बास्केटबॉल कोर्ट, जलतरण तलाव, अत्याधुनिक व्यायामशाळा असे सर्व सोयींनी युक्त असे क्रिडा संकुल मंजूर होत आहे, त्यासाठी आवश्यक असे जागेचे लेव्हलींग, मोजणी इत्यादी काम सुरूही झाले आहे.
*खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाहुपुरीत अनेक विकासकामे केली आहेत पण खासदार उदयनराजे यांच्या प्रयत्नातून पूर्णत्वाकडे आलेली कण्हेर पाणी पुरवठा योजना व हे प्रस्तावित क्रिडा संकुल हे शाहुपुरीच्या अनेक विकासकामांच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरणार आहे*

Adv