शाहुपूरी ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटची उभारणी सातारा जिल्हा परिषदेच्या मान्यतेने, शाहुपूरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन सन २००७-०८ चे सुमारास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. त्यावेळपासून स्ट्रीट लाईटचे बिल शासन,जि.प.स्तरावरुन भरण्यात येत
आहे. २०१८ पासून असा काय बदल झाला असा सवाल करुन, तत्कालीन ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश आरडे
आणि उपसरपंच राजु गिरीगोसावी यांनी ग्रामपंचायतींचा जीव तो किती आणि स्ट्रीट लाईटचे बिल किती याचा विचार करुन, पूर्वीप्रमाणेच सदरच्या स्ट्रीट लाईटचे लाईट बिल शासनाकडून म्हणजेच जिल्हापरिषद गरजेचे आहे. तथापि जिल्हापरिषदेने सदरचे बिल न भरल्याने, सदरची वीज खंडीत करण्यात आलेली आहे. तसेच फक्त शाहुपूरीचेच स्ट्रीट लाईट कनेक्शन तोडलेले नाही तर महाराष्ट्रातील बहुतांशी ग्रामपंचयातींचे कनेक्शन तोडलेले आहे. मात्र दुस-याचे कुसळ शोधणारे, निवडणुका जवळ आल्या मुळे राजकारण म्हणून तत्कालीन शाहुपूरी ग्रामपंचायतीवर चिखलफेक करण्याची संधी साधत आहेत असा पलटवार कोणाचेही नांव न घेता केला आहे.
शाहुपूरीचा भाग आता नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट झाला आहे. ज्या दिवसापासून नगरपरिषदेमध्ये सदरचा भाग समाविष्ट झाला आहे तेव्हापासून नगरपरिषद स्ट्रीट लाईटचे बिल भरण्यास बांधिल आहे. याकारीता संबंधीत विद्युत अभियंता आणि मुख्याधिकारी यांना स्ट्रीट लाईट वेळेवर आणि नियमितपणे सुरु राहणेकामी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जरुर त्या सूचना दिलेल्या आहेत. खासदार महोदय श्रीमंत
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जरुर त्या सूचना संबंधीतांना दिलेल्या असल्याने, शाहुपूरीच्या स्ट्रीट लाईटस पूर्ववत कार्यरत राहतील असे नमुद करुन तत्कालीन सरपंच आणि उपसरपंच यांनी दिलेल्या संयुक्त प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे
शाहुपूरीच्या तत्कालीन ग्रामस्थ नागरीकांनी, आमचे नेते आणि लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विचारांना साथ दिली आहे. याची जाणिव ठेवून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा स्थानिक विकास निधी किंवा शासकीय निधी जास्तीत जास्त शाहुपूरी गटाला उपलब्ध करून दिलेला आहे. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत स्थापनेपासून ते नगरपरिषदेमध्ये सदरचा भाग समाविष्ट होईपर्यंत खा श्री छ उदयनराजे भोसले यांचे नेतृत्व मानणारे सत्ताधारी गट कार्यरत असल्याने, विकासकामांचे प्रस्ताव देखिल तातडीने पारित करण्यात येवून, पुढील निर्णयार्थ जिल्हापरिषदअथवा शासनाकडे सादर करणे, इत्यादी कामे जलद झाली. कण्हेर उद्भव- २४ बाय ७ ही ४२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, १५५० दिवे उभारणेची स्ट्रीट लाईट योजना, गेल्या सुमारे १८ वर्षात सुमारे ७० कोटींची विविध रस्ते आणि सोसायट्यांमधील अंतर्गत
रस्ते, गटर्स इत्यादी विकास कामे,पाच ओपन जीमस,, ग्रामपंचायतीची दिड कोटीची सुसज्य इमारत,अद्यावत शव वाहिका, कचरा साठु नये म्हणून घंटागाडया, इत्यादी प्रमुख व अन्य सर्व कामे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या स्थानिक विकास निधीमधुन आणि माध्यमातुन पूर्ण करण्यात आलेली आहेत.शाहुपूरीचा कचरा सोनगांव कचरा टाकण्यास यांच्याच बगलबच्चांनी विरोध करुन त्यावेळी गाडया अडवल्या होत्या. त्यांनाच आता शाहुपूरीचा कळवळा आला आहे. त्यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
यांनी नगरपरिषदेला कचरा टाकु देण्यास परवानगी दया अश्या सक्त सूचना दिल्या. म्हणूनच शाहुपूरीकरांचा विश्वास खा छ उदयनराजे भोसले यांच्यावर अधिकाधिक दृढ झाला आहे.परंतु स्वतः प्रचंड ज्ञानी आणि आक्रमक म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारे सुतावरुन स्वर्ग गाठत लगेच भ्रष्टाचाराचे
आरोप करण्यास सरसावले आहेत. शाहुपूरीत भ्रष्टाचार झाला मग इतर ग्रामपंचायतींच्याही स्ट्रीट लाईट तोडल्या आहेत त्यातही भ्रष्टाचारच झाला असेच त्यांना म्हणायचे असेल तर ते सर्वथा चुकीचे आहे. स्ट्रीट लाईटचे बिल कुणी भरण्याचे हा वाद असु शकतो, त्यावर तोडगा निघु शकतो, परंतु हे ज्ञानी साप समजुन भुई थोपटत आहेत असा टोला लगावला आहे.
सध्या स्ट्रीट लाईटचा प्रश्न जिल्हापरिषदेने स्ट्रीट लाईटचे बिल न भरल्याने निर्माण झाला आहे. तो फक्त शाहुपूरी पुरताच मर्यादित प्रश्न नाही. संपूर्ण राज्यामधील ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे. सुदैवाने नगरपरिषदेच्या हदीत भाग समाविष्ट झाला असल्याने, त्यावेळपासूनची स्ट्रीट लाईटची जबाबदारी नगरपरिषदेवर येणार आहे. ती जबाबदारी नगरपरिषद बिनचुकपणे पार पाडेल. परंतु पूर्वीची जबाबदारी
जिल्हापरिषदेची / शासनाची राहील व शासन याबाबत योग्य तो निर्णय घेईलच. आम्ही कधीही सवंग लोकप्रियतेसाठी आम्ही कधीही काम करीत नाही. जनसेवा म्हणून आम्ही आणि सत्तारुद गटाने शाहुपूरीकरांची सेवा केलेली आहे. त्यामुळे प्रसिध्दीसाठी आम्ही कधीही काही करत नाही असे देखिल प्रसिध्दीपत्रकात नमुद करण्यात आलेले आहे.याकामी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संबंधीतांना योग्य त्या सूचना दिलेल्या असल्याने, लवकरच शाहुपूरीचीच नव्हे तर महाराष्ट्रातील कनेक्शन तोडलेल्या ग्रामपंचयातींच्या स्ट्रीट लाईटस
पूर्ववत कार्यरत राहतील अश्या शब्दात तत्कालीन सरपंच आणि उपसरपंच यांनी शाहुपूरीकरांना आश्वस्त केले आहे.