सातारच्या शाहुपूरी येथील कण्हेर उद्भव २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेतील सर्वांत शेवटचा वनविभागाचा अडथळा दूर करण्यात आला आहे. सारखळ खिंडीजवळील बनविभागाच्या हद्दीमधुन काम करण्यास नुकतीच मंजूरी मिळाली आहे त्यामुळे घर तथे नळ ही संकल्पना समस्त शाहुपूरीकरांसाठी अंमलात येण्यास आता विलंब होणार नाही फॉरेस्टची अंतिम मंजूरी मिळाल्याने आता गतीने काम करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्राधिकरणाला दिल्या असून आता प्रतिक्षा संपली अश्या शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रखडलेल्या किंवा रखडवण्यात आलेल्या योजनेविषयी आश्वासक भाष्य केले आहे.
याबाबत माहीती देताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की, शाहुपूरीकर नागरीक आणि आमचे नेहमीच जिव्हाळयाचे संबंध राहीले आहेत. सातारकरांना नाही तर शाहुपूरीकरांना तरी कण्हेर उद्भव योजनेमधुन दिवसातील चोवीसतास आणि आठवडयातील सातही दिवस पुरेसे शुध्द पाणी मिळावे म्हणून सन २०१२ चे सुमारास शाहुपूरीसाठी कण्हेर पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार शासनाकडे एमजेपी मार्फत प्रस्ताव पाठविणेत येवून सुमारे ४२ कोटींची योजना मंजूर करण्यात आली. तत्कालीन एमजेपीच्या अधिका-यांनी या योजनेकामी केलेले सर्वेक्षण सातत्याने होत असलेला विकास लक्षात घेता परिपूर्ण नसल्याने, या योजनेचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे अश्या सूचना आम्ही दिल्या. त्यानुसार विस्तृत आणि परिपर्ण सर्वे झाल्यावर शाहुपूरी पाणीपुरवठा योजनेच्या १२ कोटींची वाढीव योजना फेर प्रस्तावित करण्यात
आली. दरम्यानच्या काळात, राज्यशासनाने जुन्या पाणीपुरवठा योजना ज्या अपूर्ण आहेत त्यांना प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देण्याचा धोरणात्मक निर्णय संपूर्ण राज्याकरीता लागु केल्याने, वाढीव रुपये १२ कोटी सह पूर्वीची मंजूर करण्यात आलेली कण्हेर पाणीपुरवठा योजना शाहुपूरीकरांसाठी अंतिमतः साकारण्यात आली असे असेल तरी केवळ ३५० मिटर वन विभागाच्या क्षेत्रातुन ही पाणीपुरवठा पाईपलाईन जातअसल्याने, याकामी बनविभागाची मंजूरी मिळणे अत्यंत जरुरीचे होते. वन विभाग काही केल्या तयार होत नव्हता शेवटी आमच्या पध्दतीने या प्रश्नाची सोडवणुक करण्यात आल्याने आणि सध्याचे उप वनसंरक्षक श्री मोहिते यांनी सकारात्मक सहकार्य केल्याने, या ३५० मिटर क्षेत्रातुन पाण्याची पाईपलाईन जावू देण्यास वन विभागाने मंजूरी प्रदान केलेली आहे या कामी शाहुपूरी पाणी पुरवठा होवू नये म्हणूनही काही प्रयत्न झाले असावेत अश्या शंका आमचे अनेक कार्यकर्ते आमच्याकडे बोलुन दाखवत असत. तथापि शासनाचे काम आणि सहा महिने थांब हा अनुभव शासकीय योजनांनाही अनुभवावा लागणे हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव म्हणावे का सुदैव हे ज्याचे त्याने ठरवावे असे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढे नमुद केले आहे की, शाहुपूरी पाणीपुरवठा योजना- कण्हेर
उद्भव या योजनेचे संपूर्ण श्रेय हे आमचे नसुन समस्त शाहुपूरी करांचे आहे तथापि ही योजना साकारण्यासाठी पंचायतसमितीचे माजी उपसभापती आणि संजय पाटील यांची महत्वाची भुमिका वठवली आहे. योजना मार्गी कशी लागत नाही याचा चंगच त्यांनी आणि त्याच्या तत्कालीन ग्रामपंचायत सदस्यांनी बांधला
होता.योजना मंजूर होवून मार्गी लागणे आणि पूर्ण होणे यामध्ये अनेक स्तरामधुन कार्यवाही होत असते. त्यामुळे विलंबाने का होईना परंतु अनेक अडथळे पार पाडत आज ही योजनेतील मुख्य अडसर बाजुला करण्यात आला आहे.त्यामुळे आता येत्या काही दिवसांत ही योजना शक्य तितक्या लवकरपूर्ण करण्याकडे आमचा आणि आमच्या सहका-यांचा कटाक्ष राहणार आहे असेही श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकात शेवटी नमुद केले आहे.दरम्यान, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी, घर तेथे नळ उपक्रम राबविण्याच्या सूचना न.प.मुख्याधिकारी श्री अभिजीत बापट यांना केल्या. शाहुपूरीतील नागरीकांना त्यांच्या मागणीप्रमाणे नवीन नळ
कनेक्शन तातडीने देण्याची यंत्रणा कार्यान्वित करा अश्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहे.