शाहूनगर येथील रस्त्याचा प्रश्न जय सोशल फाउंडेशनच्या प्रयत्नाने सुटला

211
Adv

<img src="https://sataranama.com/wp-content/uploads/2021/12/IMG-20211217-WA0059-300×240.jpg" alt="" width="300" height="240" class="alignnone size-medium wp-image-3885" /गेल्या महिन्यात शाहूनगर भागातील रस्ते दुरुस्त करून ते चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी जय सोशल फाउंडेशनचे सागर भोसले यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती तेव्हाच पालिका प्रशासनाला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आदेश दिले होते सदरचे रस्त्याने तातडीने करून घ्यावेत या जय सोशल फाउंडेशनच्या मागणीला आता यश आले असल्याचे दिसून येते

गेल्या काही महिन्यांपासून सागर भोसले शाहूनगर भागातील रस्ता दुरुस्त होऊन चांगल्या प्रतीचा वाहवा यासाठी त्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन ही मागणी केली होती तेव्हाच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला आदेश दिले होते की शाहूनगर भागातील रस्ता हा दुरुस्त करून तो चांगल्या प्रतीचा बनवा या मागणीला यश येत असून सदरचे रस्त्याचे काम हे युद्धपातळीवर सुरू असून जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लागल्याने शाहूनगरवासीयांनी जय सोशल फाउंडेशन व सागर भोसले यांचे आभार मानले आहेत

पाण्याचा प्रश्न, रस्ते, लाईट व विविध सामाजिक उपक्रम राबवून जय सोशल फाउंडेशन व सागर भोसले यांनी शाहूनगर वासियांची मने जिंकली असून आता होणाऱ्या खड्ड्यांच्या त्रासापासून शाहूनगरवासियांना मुक्ती मिळून दिली असल्याने शाहूनगर वासियांनी जय सोशल फाउंडेशन व सागर भोसले यांचे कौतुक करताना दिसत आहेत

Adv