सातारा शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या शाहूनगर परिसरामध्ये लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर भोसले यांनी दिली हा उपक्रम लोकवर्गणीतून साकारला जाणार आहे
हद्दवाढीच्या भागासाठी राज्य शासनाने खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल 48 कोटी रुपये मंजूर केले आहेत पायाभूत सुविधांसाठी शाहूनगर सारख्या भागांमध्ये साधारण दहा कोटी रुपये वाट्याला येतील असा अंदाज आहे सातारा नगरपालिकेने या संदर्भातील विकास आराखडा बनवला आहे तरी सुद्धा ही कामे सुरू होऊन प्रत्यक्ष मार्गी लागणे पर्यंत बराच कालावधी जाणार असल्याने काही सुविधा या लोकवर्गणीतून करण्याचे जय सोशल फाउंडेशनने ठरवले आहे फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भोसले आणि शाहू नगर परिसरातील 21 कॉलन्यामधील नागरिक स्वतःहून पुढे आले आहेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सर्वांनी होकार दिला असून येथील अजिंक्य रिक्षा स्टॉप परिसरात प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत या लोकवर्गणीचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे
हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर याच धर्तीवर एसटी कॉलनी परिसर ,जगताप वाडी परिसर, आणि शाहूनगरच्या अंर्तगत काही भागांमध्ये अशा पाच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत जय सोशल फाउंडेशन ने यापूर्वीही पायाभूत सुविधा तसेच पाणीपुरवठा या प्रश्नांमध्ये जाणीवपूर्वक लक्ष घातले आहे या सीसीटीव्ही उपक्रमा संदर्भात बोलताना सागर भोसले म्हणाले की सातारा शहराच्या हद्दवाढीमुळे नंतर ग्रामीण भागांचा विकास झपाट्याने होतो आहे शाहूनगरमध्ये कधीही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व नागरिकांची सुरक्षितता राखली जावी याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे या सीसीटीव्हीचा कंट्रोल रूम एका सुरक्षित ठिकाणी केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले