
ऐतिहासिक शाही सीमोल्लंघन मिरवणुकीच्या नियोजनासाठी खा श्री छ उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी 1:30 वाजता शाहूकला मंदिर सातारा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मित्र समूहाच्या वतीने देण्यात आली
दसऱ्याच्या दिवशी साताऱ्यात पारंपारिक पद्धतीने शाही दसरा साजरा होतो यानिमित्तानेच खासदार श्रीमंत छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते जिल्हा परिषदेचे आजी माजी नगरसेवक व श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र समूहाचे कार्यकर्ते यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले असल्याचे समजते
साताऱ्यात शाही दसऱ्याच्या मिरवणुकीची परंपरा असून समस्त सातारकर या दिवशी ही मिरवणूक पाहण्यासाठी साताऱ्यातील राजपथावर गर्दी करताना दिसून येतात