महाराष्ट्र शासनाचा उद्योग व तंत्र विभाग आणि खासदार उदयनराजे भोसले मित्र समूह यांच्या संयुक्त सहकार्याने दिनांक 21 व 22 मे रोजी येथील यशोदा टेक्निकल कॅम्पस परिसरात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात पहिल्या टप्प्यांमध्ये साडेसातशे तरुण युवकांना मुलाखती घेऊन थेट नेमणूक पत्र देण्याचा कार्यक्रम होणार आहे या मेळाव्यात नामवंत कार्पोरेट कंपन्या सहभागी झाल्या असून या कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदय सामंत यांचे विशेष उपस्थिती आहे याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली
यावेळी माजी उपनगराध्यक्ष दत्ता बनकर,माजी जिल्हा परिषद सभापती सुनील काटकर,काका धुमाळ,संग्राम बर्गे,विनीत पाटील इत्यादी उपस्थित होते
खासदार छ उदयनराजे भोसले पुढे म्हणाले 1974 मध्ये सातारा व अहमदनगर येथील औद्योगिक वसाहती एकाच वेळी स्थापन झाल्या . मात्र अहमदनगर औद्योगिक वसाहतीचा राजकीय इच्छाशक्तीतून मोठा विकास झाला . मात्र साताऱ्यात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या असमाजिक घटकांमुळे सातारा औद्योगिक वसाहतीचा म्हणावा असा विकास झालेला नाही . एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्लॉट ताब्यात घेणे आणि त्याचा रेसिडेन्शिअल प्लॉट करणे असे नको ते उद्योग केले जात आहेत . या प्रकाराची सखोल चौकशी करून अंतिम सत्य आम्ही बाहेर आणणार आहोत अशी भूमिका त्यांनी मांडली
साताऱ्यातील तरुण-तरुणींना पुणे मुंबईला न जाता साताऱ्यातच रोजगार मिळावा याकरिता दिनांक 21 मे व 22 मे रोजी येथील यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये जॉब फेअर अर्थात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे . यामध्ये टाटा, महिंद्रा, बजाज तसेच अन्य सहा कार्पोरेट कंपन्या सहभागी झाले असून स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या 50 वेगवेगळ्या कंपनीने या उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे . पहिल्या टप्प्यामध्ये या कार्यक्रमासाठी साडेसातशे तरुणांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे . सकाळी आठ ते चार या वेळेमध्ये पहिल्यांदा मुलाखत त्याचबरोबर समुपदेशन आणि नियुक्तीनंतर नियुक्तीपत्र देऊन थेट रोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत . ज्या उमेदवारांची निवड होणार नाही त्यांना पुन्हा समुपदेशन आणि प्रशिक्षण देऊन त्यांनाही रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे . महाराष्ट्राच्या उद्योग विभागाने रत्नागिरी, निपाणी त्यानंतर सातारा जिल्ह्याला ही संधी दिली असून या मेळाव्यामध्ये किमान पाच हजार तरुणांना रोजगार दिला जाईल असे आयोजन करण्यात आले आहे . या रोजगार मेळाव्याचा अधिकाधिक तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे यावेळी खासदार उदयनराजे भोसले आणि सहकारी यांच्या वतीने रोजगार मेळाव्याचे कुपन आणि नोंदणी प्रमाणपत्र प्रकाशन करण्यात आले