साताऱ्याचे युवा उद्योजक सागर भोसले यांच्या जय सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून हरित सातारा सुंदर सातारा असा नारा देण्यात आला आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येत्या पाच जून रोजी एक घर एक झाड या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे हा शुभारंभ शाहूनगर परिसरात होणार असून या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक कुटुंबाने एक झाड दत्तक घ्यावयाचे आहे
जय सोशल फाउंडेशन ने शाहूनगर आणि लगतच्या खोल्यांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत हद्दवाढ झाल्यानंतर नव्यानेच शहरात समाविष्ट झालेल्या शाहूनगर जगताप वाडी रामराव पवार नगर गोळीबार मैदान इत्यादी परिसरामध्ये पायाभूत सुविधा देण्याकरिता जय सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू असतात सागर भोसले यांनी यंदा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त म्हणजे 5 जून रोजी सातारा शहर परिसर हरित करण्याचा संकल्प सोडला आहे यामध्ये एक घर एक झाड उपक्रम राबवला जाणार आहे
आपल्या घराजवळ ओपन स्पेस मध्ये तसेच मंदिर किंवा रस्त्याकडेला आपण जिथे मागणी कराल तिथे जय सोशल फाउंडेशन खड्डा करून देणार तसेच तेथे फळ झाड किंवा फुल झाड लावून देणार त्या कुटुंबाने त्या वृक्षाची फक्त निगा राखा वयाची आहे पहिल्या टप्प्यामध्ये जय सोशल फाउंडेशन ने लोकसहभागातून यंदाच्या पावसाळ्यात किमान दोन हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे ही मोहीम दरवर्षी राबविण्यात जाणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून सातारा शहर परिसर हरित होऊन जाईल आणि पर्यावरणाला सुद्धा त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत सागर भोसले यांनी नोंदविले या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जय सोशल फाउंडेशन हरित सातारा 9021115004 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे