महाराष्ट्रातील सर्वांत मोठी स्व.श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज उर्फ दादा महाराज चषक दिवस-रात्र टेनिस बॉल स्पर्धा शुक्रवार दिनांक 07/ 02/2025 पासून सातारा श्री.छ.शाहू स्टेडियम येथे सुरु होत आहे. तसेच स्पर्धेचा समारोप रविवार दिनांक 23/02/2025 रोजीच्या अंतिम सामन्यानंतर होणार आहे.
या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी राज्यातील क्रीकेट संघानी दिनांक 06/02/2025 अखेरपर्यंत सातारा येथील श्री.झुंजार कदम-9922761010,विराज स्पोर्टस,9420272112, किंवा विघ्नहर्ता स्पोर्टस,9881575384 यांचेशी संपर्क साधुन आपला स्पर्धेती सहभाग नोंदवावा असे आवाहन स्पर्धेचे मुख्य आयोजक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले मित्र समुहाच्या वतीने दिली आहे.
दिवस-रात्र क्रीकेट स्पर्धा केवळ महानगरामध्ये आयोजित होत असताना, सातारा जिल्हा क्रीकेट असोसिएशन, क्रीडाप्रेमी मान्यवर,क्रीकेटपटु यांच्या सक्रीय सहकार्यामुळे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समुहाच्या वतीने सुमारे 21 वर्षापूर्वी सन 2003 मध्ये सातारच्या श्री.छ.शाहू स्टेडीयम येथे स्व.प्रतापसिंहमहाराज उर्फ दादामहाराज दिवस-रात्र टेनिस चेंडू क्रीकेट स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. यंदाचे वर्षी या स्पर्धेचे 22 वे वर्ष आहे.
यंदाच्या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकाना रोख बक्षिसे व चषक प्रदान करण्यात येणार आहे. प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे रुपये 3 लाख, 2 लाख व 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तृतीय क्रमांकाचे बक्षिस जिंकणा-या आणि हरणा-या संघात विभागून देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन उदयनराजे भोसले मित्रसमुहातर्फे करण्यात आले असून, सातारा क्रीकेट असोसिएशन तर्फे आंतर्राष्टीय नियमानुसार स्पर्धाचे आयोजन होणार आहे.क्रीकेट स्पर्धेसाठी उच्य क्षमतेचे हायमास्ट प्रकाशझोताचे आवश्यक दिवे लावण्यात येणार आहेत. तसेच खेळपटटी टेनिस क्रीकेटच्या नियमानुसार बनविणेत येत आहे. स्पर्धेच्या क्रीडांगणावरील (पीच वरील )प्रत्येक निर्णयाचे पुर्नविलोकन होण्यासाठी थर्ड अंपायची विशेष व्यवस्था असणार आहे.
या स्पर्धेच्या अंतिम दिवशी म्हणजेच दिनांक 23/02/2025 रोजी सेमी फायनल आणि फायनलच्या मॅचेस होणार असून,फायनल मॅच नंतर लगेचच बक्षिस समारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या स्पर्धेला क्रीडा समिक्षक आणि मार्गदर्शक सुरेश साधले, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी घेतलेले अमोल पाटुकले यांचेसह उदयनराजे भोसले मित्र समुहाचे सर्व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत. सातारकर क्रीकेट प्रेमींनी या स्पर्धेचा मनमुराद आनंद प्रत्यक्ष उपस्थित राहून घ्यावा असेही आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.