सातारा विकास आघाडीमध्ये विकास करण्याची धमक शाहूपुरीत विकास कामांचे श्री छ उदयनराजे यांच्या हस्ते उद्‌घाटन

267
Adv

सातारा नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्व रहिवाश्यांना, मुलभुत सुविधा प्राधान्याने मिळाल्यापाहीजेत. याच विचारातुन प्रत्यक्ष कृती करुन, गतीमान विकासाकरीता साविआ प्रयत्नशील आहे.
सुमारे वर्षभरापूर्वीच नगरपरिषदेच्या हद्दी समाविष्ट झालेल्या शाहुपूरी सह सर्वच भागाचा कोणताही दुजाभाव न ठेवता निरंतर विकास करीत राहणे हेच आमचे प्रयत्न आणि उदिष्ट आहे, त्यासाठी कोणतीही कसरत करायला लागली तरी ती केली जाईल असा शब्द सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शाहुपूरी वासियांना दिला.शाहुपूरी भागातील दुस-या टप्यातील विविध विकास कामांच्या भुमीपूजन आणि लोकार्पण प्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले नागरीकांशी हितगुज साधताना बोलत होते.यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे नगरसेवक डि.जी.बनकर, नगरसेवक किशोर शिंदे, माजी उपसभापती संजय पाटील,माजी सरपंच गणेश आरडे,राजु गिरीगोसावी, अमित कुलकर्णी, अनिरुध्द दाभाडे, आदी मान्यवर प्रमुख
उपस्थित होते.

सातारा विकास आघाडीकडे कामे मार्गी लावण्याची धमक आहे. विकास काम होवून, त्याचा लाभ लोकांनी घेतला पाहीजे, नागरीकांची सोय झाली पाहीजे हा एकच ध्यास घेवून, सकारात्मक पध्दतीने वाटचाल करणारी सातारा विकास आघाडी ही आमची किंवा साविआ च्या नगरसेवकांची
आहेच तथापि साविआ ही नागरीकांनी, नागरीकांच्याकरीता उभारलेली आणि नागरीकांच्या प्रत्यक्ष सहभागाची आघाडी आहे. दहा कामे मार्गी लागताना, एक-दोन कामे होताना विलंब होतो.परंतु साविआच्या धोरणात कोठेही खोट दिसणार नाही असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी खासदार श्री उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत, खालील
कामांचे भुमीपूजन करण्यात आले तर काही पूर्तता झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले.किर्दत घराजवळ- शार्दुल ते कॅनॉल रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाचे भुमीपूजन शिवाजीनगरशिवाजीनगर चौक ते जवाहर कॉलनी ओढा रस्ता डांबरीकरण- लोकार्पण सहयाद्री पार्क- सहयाद्री पार्क ते काका घाडगे अखेर रस्त्यांचे डांबरीकरण करणे- भुमीपूजन
सारडा कॉलनी-सारडा कॉलनी पुलाचे रुंदीकरण करणे समता पार्क- बंदिस्त गटर लोकार्पण शाहुपूरी मुख्य रस्ता- डॉ.दिवेकर दवाखाना ते शाहुपूरी जकातनाका रस्ता डांबरीकरण करणे-भुमीपूजन रामचंद्र कॉलनी- रस्ता डांबरीकरण करणे, भुमीपूजन पिलेश्वरी म्हसवे रोड डांबरीकरण करणे कामाचे भुमीपूजन नर्मदा शाळा- रस्ता डांबरीकरण करणे कामाचे भुमीपूजनयावेळी ग्रामोपाध्ये, रमेश धुमाळ, ललितकुमार, सुरेश पाटील, मधुकर जाधव, अक्षय घाडगे,मोरे किराणावाले, समीर निकम, तत्कालीन ग्रामपंचायत सदस्या मुग्धा पुरोहित,सदस्य ग्रामोपाध्ये,धुमाळसाहेब, काका घाडगे, सुनील शिंदे, देवदत्त देसाई, तोबोळी, राजु कदम, राजु मोरे,कुणाल मोरे, राहुल यादव, आबा यादव, महेश मोहिते, मिथुन मोहिते, अमोल गुजर, सदस्या शितोळे ताई, पिंटु शितोळे, नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, बबन पाटील, शंकर किर्दत,काका किर्दत, अण्णा राजापुरे, संजय गानु, पृथ्वी ठाणे, पप्पु राजापुरे, तेजस किर्दत, महेश कदम,वसंत शिंदे, दिपक आवकरे,
दरम्यान, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे प्रत्यक कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरीक बंधुभगिनींमार्फत उत्स्फूर्त स्वागत करण्यात, महिला भगीनींनी काही ठिकाणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे औक्षण केले.खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले स्वागत,फटाक्यांच्या माळा लावून, करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठया संख्येने नागरीक सोशल डिस्टन्सिंग राखुन, उत्साहाने गोळा होत होते तसेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या विकास कामाच्या धडाक्याचीही चर्चा नागरीकांमध्ये होत होती.

Adv