सातारा नगराध्यक्षपद ओबीसी पुरुष असे आरक्षण पडण्याची शक्यता?

72
Adv

अनेक वर्षापासून रखडलेल्या नगरपालिका निवडणूक येत्या दोन महिन्यात निश्चित होणार याची आशा निर्माण झाली आहे
जिल्हा प्रशासन स्तरावर हालचाली सुरू झालेल्या आहेत येत्या सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची सोडत होणार आहे सातारा जिल्ह्यातील सातारा नगरपालिका ही अ वर्ग नगरपालिका म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

राज्य व देश स्तरावर नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण मध्ये उठावदार कामगिरी केलेली आहे दरम्यान सातारा नगरपालिकेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींची मुदत संपून किमान चार वर्षे झाले. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही या काळात प्रशासक काम करीत आहे

नगरपालिकेच्या निवडणुका होणार या अनुषंगाने अनेक
तारखाची चर्चा होत होती मात्र निवडणुका झाल्या नाहीत
अलीकडच्या काळामध्ये प्रभाग रचना करण्यात आली त्याला
प्रसिद्धी देण्यात आली प्रभाग रचनेवर हरकती मागवण्यात आल्या त्याची सुनावणी झाली मतदार याद्यांचे काम सुरू झाले आहे आता ६ ऑक्टोबर रोजी नगराध्यक्षपदाची सोडत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी बरेच वर्षापासून obc प्रवर्गासाठी आरक्षण नसल्यामुळे यावेळी obc प्रवर्गासाठी नगराध्यक्ष पद राखीव राहील असा अनेकांनी अंदाज व्यक्त केला आहे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणात्या वर्गासाठी राखीव असणार हे ६ ऑक्टोंबर रोजी निश्चित होणार आहे.

Adv