सातारा पालिकेचा महसूल बुडवून पालिकेच्या जागेत अतिक्रमण असलेल्या जुना मोटर स्टँड येथील पेट्रोल पंपाचा भाडेपट्टी चा करार संपला असून मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ती जागा ताब्यात घेऊन सदरच्या जागेची लिलाव प्रक्रिया राबवावी अशी मागणी सातारकर जनतेतून होत आहे
जुना मोटर स्टँड येथील पेट्रोल पंप गेल्या अनेक वर्षापासून हे पालिकेचा जागेत अतिक्रमण करून बिनधास्तपणे आपला व्यवसाय करत आहेत या व्यवसायातून त्यांनी कोट्यावधीची माया जमवली असल्याचे समजते सदरची जागा ही सातारा पालिकेची मिळकत असून मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी या जागेचा ताबा घेऊन याची लिलाव प्रक्रिया राबवावी अशी मागणी आता सातारकर जनतेतून होऊ लागली आहे
पालिका दंड करण्याच्या तयारीत
सातारा पालिका जुना मोटर स्टँड येथील त्या पेट्रोल पंपांवर दंड करण्याच्या तयारीत असून दंड हा केलाच पाहिजे दंड करून या जागेची लिलाव प्रक्रिया राबवावी तरच आपले प्रशासन पारदर्शक असल्याचे दिसून येईल अन्यथा अतिक्रमण करणाऱ्यांचे लाड सातारा पालिका करते हे दिसून येईल
क्रमश