सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी खासदार गटाचे मनोज शेंडे यांची वर्णी लागली असून त्यांच्या निवडीची आता दिनांक बावीस रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत घोषणा होण्याची औपचारिकता बाकी आहे नगरसेवक मनोज शेंडे यांना उपनगराध्यक्ष पदाचा अनुभव असल्याने खासदार गटाला याचा फायदा होणार आहे .सातारा पालिकेच्या नगरसेवकांच्या संख्येला अनुसरून पाच स्वीकृत नगरसेवक सदस्य पदी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे .
यामध्ये खासदार गटाचे माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे व सांस्कृतिक आघाडीचे उपाध्यक्ष पंकज चव्हाण तर आमदार गटाकडून गोडोलीचे कार्यकर्ते रवी पवार उद्योजक सुनील भंडारी आणि रीना घनगे यांना संधी देण्यात आली आहे .विठासन अधिकारी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक बारा ते दीड या दरम्यान उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबवली जाणार आहे .यामध्ये बारा वाजता अर्ज दाखल करणे साडेबारा वाजता अर्ज छाननी त्यानंतर पीठासन अधिकारी अमोल मोहिते उपनगराध्यक्ष प्राप्त अर्जाची घोषणा करणार आहे .उपनगराध्यक्ष म्हणून सातारा विकास आघाडीचे मनोज शेंडे यांना संधी मिळाली आहे .नगरपालिका कामाचा अनुभव आघाडीतील सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय तसेच प्रशासनाबरोबर काम करण्याची हातोटी यामुळे शेंडे यांनाही संधी देण्यात आली आहे .तसेच आता सभागृह कामकाजासाठी आणि इतर तांत्रिक कारणांकरिता भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रतोदपदी खासदार गटाचे निशांत पाटील आणि भाजप गटनेतेपदी आमदार गटाचे अविनाश कदम यांची वर्णी लागली आहे .स्वीकृत सदस्यांची निवड करताना सुद्धा नव्या जुन्या चेहऱ्यांचा समन्वय साधण्यात आला आहे .खासदार गटाकडून शंकर माळवदे आणि पंकज चव्हाण आणि आमदार गटाकडून रवी पवार आणि सुनील भंडारी तसेच रीना भनगे यांना संधी मिळाली आहे .सोमवारी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये या सदस्य नगरसेवकांची घोषणा होणार आहे .






