सातारा पालिकेचा राज्यात डंका; माझी वसुंधरा 3.0 अभियानात प्रथम

401
Adv

राज्य शासनाने अमृत योजनेअंतर्गत लोकसंख्या निहाय माजी वसुंधरा अभियान स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातील सातारा कराड पाचगणी दहिवडी महाबळेश्वर या पाच नगरपालिकांनी मोठी बाजी मारली आहे यामध्ये सातारा कराड पाचगणी दहिवडी या लोकसंख्या निहाय प्रवर्गामध्ये प्रथम आले असून महाबळेश्वर नगरपालिका तृतीय आली आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून उत्कृष्ट कामगिरी करून घेतल्याबद्दल सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे

सातारा नगरपालिकेला या योजनेअंतर्गत सहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर या विभागातील अंतर्गत नगरपालिकांचे माजी वसुंधरा अभियानाचे निकाल पर्यावरण दिनाचे निमित्त साधून नगरविकास विभागाचे अपर सचिव मनोहर बंदपट्टे यांनी सोमवारी जाहीर केले एक लाख ते तीन लाख लोकसंख्येच्या गट वर्गात सातारा नगर परिषदेने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे हा गुणानु क्रमांक सातारा नगरपालिकेने विविध उपक्रमांच्या जोरावर मिळवला आहे माजी वसुंधरा अभियान अंतर्गत डेस्कटॉप असेसमेंट करता साडेसात हजार गुण ठेवण्यात आले होते यामध्ये सातारा नगरपालिकेने तब्बल 96% गुण प्राप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे या स्पर्धेत भूमी थिमॅटिक मधील सातारा नगरपालिकेची उच्चतम कामगिरी लक्षात घेण्यात आली आहे

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक 5 जून रोजी येथील मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सातारा पालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी अभिजीत बापट उपस्थित होते माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्या निमित्ताने सातारा पालिकेला सहा कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत यामध्ये नगरपालिकेने मीयावाकी वृक्षारोपण अमृत वनं, स्मृती वने ,शहरी वने, फुलपाखरू उद्यान ,रोपवाटिकांची निर्मिती, जलसंवर्धनाचे उपक्रम, रेन वॉटर हार्वेस्टिंग नदी नाले यांचे पुनर्जीवन सौर उर्जेवर चालणारे प्रकल्प विद्युत वाहनांना प्रोत्साहन इत्यादी उपक्रम राबवण्याचे निर्देशित करण्यात आले आहेत

Adv