सातारा पालिकेचा स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये राज्यात 3 रा क्रमांक

265
Adv

शहरातील दैनांदिन स्वच्छता,सूशोभिकरणावर दिलेला भर, आरोग्य कर्मचार्‍यांची कलात्मक व त्यांनी झोकून केलेले काम, मुख्याधिकारी अभिजीत बापट आरोग्य विभाग व विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नामुळे सातारा नगरपरिषदेने यावर्षीही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात ११ वा क्रमांक पटकावला.राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते विजेत्या नगरपरिषदांचा सन्मान करण्यात आला.यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पूरी, सचिव मनोज जोशी सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजीत बापट या वेळी उपस्थित होते.

सलग दुसऱ्या वर्षी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या कामगिरीमुळे सातारा पालिकेचा देशात व राज्यात गुणगौरव झाला आहे यापुढे देशात व राज्यात कसा प्रथम क्रमांक पटकावता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले पुरस्कार मिळाल्याबद्दल साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सातारा विकास आघाडी व माजी नगरसेवकांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचे अभिनंदन केले

Adv