सातारा नगरपरिषदेच्या दि.27/08/2021 रोजी होणा-या स्थायी समिती व दि.03/09/2021 रोजी होणा-या सर्वसाधारण सभेमध्ये नवीन हद्दवाट क्षेत्रामधील विविध विकास
कामांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. नवीन हद्दवाढ क्षेत्र व मूळ क्षेत्र याचा समयोचित समन्वय साधुन दोन्हीभागातील विविध कामांसाठी भरीव निधीची तरतूद करुन, सातारा विकास आघाडी सातारकरांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करीत असल्याचे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे. गेली दिड वर्षे कोरोनाच्या हाहा:काराने संपुर्ण जग ग्रासले आहे. त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांनाही मोठया प्रमाणावर बसला आहे. या कालखंडामध्ये शासकीय निधी,करवसुली याचा मोठया प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला तरी सुध्दाला सातारा नगरपरिषदेने नागरीकांच्या हिताला सर्वोच्य प्राधान्य देत नागरीकांच्या गरजा सोडवण्यावर भर दिला आहे. सातारा नगरपरिषदेची स्थायी समितीची सभा दि.27/08/2021 रोजी होत आहे.या सभेमध्ये शाहूनगर, गोळीबार मैदान, विलासपूर, खेड, पिरवाडी, विसावा नाका परिसर,शाहुपूरी,दरे इत्यादीहद्दवाढ क्षेत्रामधील भागाकरीता भरीव तरतूद करुन तेथील अतिआवश्यक विषय सभेमध्ये निर्णय घेवून तातडीने मार्गी लावण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने विषय क्रमांक 14, 15 आणि 16
नुसार अनुक्रमे विलासपूर आणि शाहूनगर,शाहुपूरी आणि गेंडामाळ हुतात्मा उद्यान आणि खेड हद्दीतील येथील नागरीकांना बसण्यासाठी सुमारे साडेआठ लाखांपेक्षा जास्त किंमतीचे स्टील बॅचेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच विषय क्रमांक 94 नुसार, शाहुनगर गोडोली येथील गट न.137 श्री.जाधव घर ते श्री.जगताप घर अखेर सुमारे अडिच लाखांचे पाईप ड्रेनचा विषय मंजूरीसाठी ठेवणेत आला आहे. तसेच शाहुनगर कृष्णा कॉलनी येथे सुमारे 4 लाख 77 हजाराचे रस्ता
डांबरीकरण करणेचा विषय धोरणात्मक निर्णयासाठी घेण्यात आला आहे. तसेच विषय क्रमांक 98 अन्वये मौजे शहुपूरी करंजे तर्फ सातारा सर्वे नं.29/2सैनिकी मुलांचे वसतीगृह येथे सुमारे 10 लाख रुपयांचे अतिथीगृह बांधणेचे काम विचाराधिन आहे. तसेच विषय क्रमांक 103- खेड येथील केदारनाथ निवास ते परी हॉटेल ते श्री कृष्णा हॉटेल पिछाडी आणि जय मल्हार सोसायटी अंतर्गत ठिकाणी पाईपड्रेनचे सुमारे साडे पाच लाखांचे काम मंजूरीसाठी ठेवण्यात आलेले आहे.विषय क्रमांक 106- शाहुपूरी जयविजय सोसायटी येथील ड्रेनेजची दुरुस्ती, विषय क्रमांक 107- शाहुपूरी क्षेत्र करंजे तर्फ सातारा सर्वे नं.90/2वरदविनायक सोसायटी येथे चेंबर बांधणे, विषय
क्रमांक 108- शाहुपूरी क्षेत्रामधील डांबरी रस्ते दुरुस्त करणे, विषय क्रमांक 177- शाहुपूरी क्षेत्रा वॉर्ड क्रमांक 6 मुख्य रस्ता ते फलॉवर व्हॅली अखेर रस्ता डांबरीकरण करणे, विषय क्रमांक 237शाहुपूरी क्षेत्र-सातारा नगरपरिषदेकडील ग्राम सॉफट सेवा संगण प्रणारी अद्यावत करणे, विषय क्रमांक 238- गेंडामाळ येथील फाशीचा वड येथे सुमारे 3 लाखांची विविध स्थापत्य कामे करणे, विषय क्रमांक 248 करंजे नाका येथे प्रवेशव्दार कमान बांधणे, विषय क्रमांक 249- करंजे नाका येथे
बसस्टॉप उभारणे, विषय क्रमांक 274- गोडोली जकात नाका ते अजंठा हॉटेल कडे जाणा-या रस्त्यावर असणा-या ओढयाचे पुलास संरक्षक फेन्सिंग करणे, विषय क्र.276-गोडोली येथील महारुद्र कॉलनी मधरील ओपन स्पेसला फेन्सींग करुन बेंच करणे, विषय क्रमांक 277- अजिंक्यतारा किल्ला रस्ता व चारभिंती रस्ता लगत धोक्याचे वळणावर फेन्सींग करणे, विषय क्र.278- यशवंत कॉलनी, गोळीबार मैदान याठीकाणी कॉलनी अंतर्गत लाईट व्यवस्था करणे, विषय क्र.279- शाहुनगर
गोळीबार मैदान, चारभिंती खालील वसाहतीमधील पावसाचे पाण्याने खचलेल्या रस्त्यांचे तात्पूरते मुरुमीकरण करणे, विषय क्रमांक 280- रामराव पवार नगर ते ओढयापर्यंत पाईपडून करणे, विषय क्रमांक 281- साई सोसायटी गृह संस्था याठिकाणी पाईपड्रेन करणे. विषय क्रमांक 283-आमराई ते
राराव पवारनगर रस्ता रुंदीकरण व पुलास संरक्षक कट्टा करणे, विषय क्रमांक 284-डॉ.नरेंद्र दाभोळकर घरालगत गटर दुरुस्ती करणे, विष्य क्रमांक 285- एस.टी.कॉलनी येथे पाईपड्रेन करणे, विषय क्रमांक 286- गणेश्नगर लगरत पूल बांधणे, 287- राधिकानगर येथे गटर दुरस्ती करणे.विषय क्रमांक 300- विलासपूर येथील श्री. कुंभार घर ते श्री.बाबर घरापर्यंत श्री मारुती मंदिरासमोरील गटर बांधणे, विषय क्रमांक 301- विलासपूर येथील कॉरेस्ट कॉलनीमधील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे, विषय क्रमांक 302- विलासपूर येथील अजंठा हॉटेल समोरील मोरे वस्ती मधील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे, विषय क्रमांक 303- विलासपुर मधील अफजल सय्यद ते साठे यांचे घरासमोरील रस्ता डांबरीकरण करणे, विष्या क्रमांक 304- विलासपूर येथील अजंठा हॉटेल
ते पटेल यांच्या घरापर्यात साईडपटया भरणे, विषय क्रमांक 305- शाहुपूरी येथील महानुभाव मठासमोरील स्वरुप विहार कॉलनी मधील रस्ता डांबरीकरण करणे, विषय क्रमांक 306-शाहुपूरी येथील महासनिक भवर शेजारील कातवडे वस्ती येथील रस्ता डांबरीकरण करणे, विषय क्रमांक 307-शाहुपूरी येथील पिलेश्वरी नगर मध्ये विविध ठिकाणी गटर व पाईपड्रेन करणे, विषय क्रमांक 308-शाहुपूरी येथील पिलेश्वर नगर मधील रस्ते डांबरीकरण करणे, इत्यादी भरघोस निधीची तरतूद मंजूर करणारे विषय मंजूरीसाठी कार्यक्रमपत्रिकेवर घेण्यात आले आहेत. हे सर्व विषय एकमताने मंजूर होतील असा विश्वास आहे. तसेच सदरचे विषय तातडीने पूर्ण करण्यात येणार आहेत तसेच जिल्हास्तरीय नगरोथ्थान मधून शाहुपूरी,शाहुनगर,विलासपूर,येथील अंतर्गत रस्त्यांचेडांबरीकरण करणेकामी प्रत्येकी 50 लक्ष रुपयांचे प्रस्ताव अंतिम मंजूरीस सादर केले आहेत. त्यामुळे नवीन हद्दवाढ आगात पुढील काही काळामध्ये रस्ते,गटर,लाईट,ओपन जिम, गार्डन इत्यादी सुविधा मुळे झपाटयाने कायापालट होणार असल्याचेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे. दिनांक 03/09/2021 रोजी होणा-या सर्वसाधारण सभेमध्ये विषय क्रमांक 15 अन्वये सातारा नगरपरिषदेच्या जुन्या हद्दीतील तिसरी सुधारित विकास योजना तयार करणे आणि नवीन हद्दवाढ भागाकरीता विकास योजना तयार करणे याकामी इरादा जाहीर करणे आणि नगररचना अधिकारी यांची नियुक्ती करणेबाबतचा विषय मंजूरीसाठी कार्यक्रम पत्रिकेवर घेण्यात आलेला आहे. त्यामुळे हद्दवाढ भागातील विकास योजना तयार करण्यास गती मिळणार आहे. विषय क्रमांक 22-iv- नुसार
शहराचे त्रिशंकु भागासाठी औषध फवारणी करीता एक ट्रॅक्टर आणि औषध फवारणी यंत्रणा भाडयाने यापूर्वीच लावण्यात आलेली आहे त्याची कार्योत्तर मंजूरी प्रदान करण्याचा विष्य निर्णयार्थ घेण्यात आलेला आहे. विषय क्रमांक 29 – भुयारी गटर योजनेचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे मंजूरीस पाठ विण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. विषय क्रमांक 35 अन्वये ओपन जिम बसविण्यास क्रीडा विभागाकडे प्रस्ताव पाठविणेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. विषय क्रमांक 37 अन्वये हद्दवाढ भागात विविध नागरी सुविधा उपलब्ध करुन देणेसाठी प्रकल्प अहवाल तयार करुन शासनाकडे सादर करणेबाबत विचार करण्यात येणार आहे तसेच विषय क्रमांक 38- नुसार शाहुनगर भागासाठी पाणीपुरवठा योजना राबविणेकरीता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागास ना हरकत पत्रा देणेबाबत निर्ण घेण्यात येईल. तसेच विषय क्रमांक -40- नुसार अजिंक्यतारा किल्ला पायथ्याचे वस्तीकरीता सुरक्षेच्या दृष्टीने रिटेनिंग वॉल करणे, विल्लयावर पाण्याचा विसर्ग मार्ग तयार करणे व अनुषंगिक काळासाठी प्रकल्प अहवाल तयार करणेबाबत निर्णय घेण्यात येणार आहेत. विषय क्रमांक 51 अन्वये सन 2021-22 या आर्थिक वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांग व्यक्तींसाठी राखवी ठेवण्यात आलेल्या 5 टक्के निधी वाटप करणेकामी निर्णय घेण्यात येणार आहे. याचा लाभ हद्दवाढ भागातील दिव्यांगांनाही होणार आहे.
हद्दवाढ भागासाठी नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (प्रकल्प अहवाल) तयार केला जाणार आहे. त्याचे माध्यमातुन वेगवेगळे प्रकल्प हद्दवाढ व शहरामध्ये राबविले जाणार आहेत. सातारा ही ऐतिहासिक शहर आहेच परंतु त्याचे स्मार्ट सिटी कडे वाटचाल करणेस मदत होणार आहे. त्याचबरोबर या भागात असणा-या दिव्यांग व्यक्तींना नगरपरिषदे मार्फत मदत केली जाणार आहे.सर्वांत महत्वाचे म्हणजे सध्या राज्यात पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सातारा शहर व शाहुनगर या भागात भविष्यात संभाव्य घेका लक्षात घेता, अजिंक्यतारा पायथा लगत रहिवाशी भागाकरीता रिटेनिंग वॉल, विसर्गमार्ग, ओढे-नाले यांचीबळकटी
करणे, याकामी प्रकल्प अहवाल तयर केला जाणार आहे.
शाहूनगर भागातील नागरीकांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी या भागात पाणीपुरवठा योजना म..जी.प्रा. यांचेकडुन करणेसाठी त्यांना ना हरकत प्रमाणपत्रा दिले जाणार आहे.
त्यासचेबरोबर हद्दवाढ क्षेत्रामध्ये नवीन प्रस्तावित भुयारी गटर योजना राबविली जाणार आहे. तसेच हद्दवाढ भागासाठी मुळच्या शहर हद्दीसह विकास योजना, भौगोलिक माहीती प्रमाणाली वापरुन केली जाणार आहे. त्यामुळे या भागातील मोकळया जागा सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध केल्या
जातील.सातारा विकास आघाडीने गेल्या साडेचार वर्षात सातारा शहरामध्ये ग्रेड सेपरेटर, भुयारी गटर, नवीन प्रशासकीय इमारत, पंतप्रधान आवास योजना, कास धरण उंची वाढवणे, बागांचे नुतनीकरण इत्यादी महत्वाकांक्षी प्रकल्प राबवून पूर्णत्वास नलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाठपुरावा करुन झालेल्य हद्दवाढीतील क्षेत्रासाठी विशेष निधीची तरतूद सातारा नगरपरिषदे मध्ये केल्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.