सातारा जिम्नॅशियम असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रशांत आहेरराव

411
Adv

सातारा जिल्हा जिम्नॅशियम असोसिएशनच्या अध्यक्षपदी सातारा नगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रशांत आहेरराव यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. दरम्यान, संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली असून उपाध्यक्षपदी रवी पुजारी तर सचिव म्हणून जोतीराम पवार आणि खजिनदारपदी मुरली वत्स यांची निवड करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा जिम्नॅशियम असोसिएशनच्या बैठकीत कार्यकारिणी निवडण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. यावेळी सर्वानूमते जिल्हाध्यक्ष म्हणून प्रशांत आहेरराव यांच्या नावाचा ठराव करण्यात आला. त्याला एकमुखी मान्यता देण्यात आली. यानंतर उपाध्यक्षपदी रवी पुजारी, सचिव जोतिराम पवार तर खजिनदारपदी मुरली वत्स यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून सतीश वाडकर, सनी सय्यद, उमेश चव्हाण, अरुण जोगुर, वैभव गवळी, राहूल पवार, धीरज कचरे, धनंजय देशमुख, निखिल भोसले, सुमीत क्षीरसागर, सचिन कुंभार, अमित कासट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, ही असोसिएशन सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेशी संलग्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सदस्यांचे संस्थापक राजेंद्र हेंद्रे यांनी अभिनंदन केले.
अध्यक्षपदी प्रशांत आहेरराव यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, ‘सातारा जिल्हा जिम्नॅशियम असोसिएशनच्या माध्यमातून शरीरसौष्ठवपटू घडवणे आणि या संबंधातील जनजागृती करणे आमचे उद्दिष्ट आहे. आपली असोसिएशन राज्यभरात आर्दशवत करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करायचे आहे. त्यासाठी तुमचे सर्वांचे सहकार्य हवे आहे.’
जिल्हा कार्यकारिणी निवडण्याबरोबरच असोसिएशन वाढीसाठी काय प्रयत्न करावे लागतील तसेच नवीन शरीरसौष्ठवपटूना मार्गदर्शन करण्यासाठी काय करावे लागेल, यावर विशेष चर्चा झाली.

Adv