सातारा शहरातील हद्दवाढ भागासह, शहरातील आणि शहरा लगतच्या लोकहिताच्या कामांचे प्रस्ताव,सातारा विकासआघाडीने सूचवले होते. सदरचे प्रस्तावास नियोजन समितीचे अध्यक्ष व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभुराज देसाई यांचेकडे जरुर
तो पाठपुरावा केला.राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,सातारा जिल्हयाचे पालक मंत्री या सर्वांच्या सकारात्मक सहकार्यामुळे
सातारवासियांसाठी 12 कोटी 64 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे अशी माहीती नमुद करतानाच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देतानाच, नियोजन समितीच्या निधी मंजूरीची तारीख दिनांक 21/12/2022 अशी आहे. या कामांच्या निविदा मागवून,त्या दिनांक 09/012023 रोजी काढण्यात आल्या आहेत.त्यामुळे काही टपून बसलेल्या व्यक्तींना याची माहीती होताच नेहमीच्या श्रेय घेण्याच्या सवयीची टिमकी वाजवण्याचा प्रयत्न सुरु झाला असा टोला देखिल कोणाचेही नांव न घेता लगावला आहे.
याबाबत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढे नमुद केले आहे खाली नमुद केलेली कामे साविआने सुचवली, प्रस्तावित केली.त्याचा पाठपुरावा केला आहे या कामांमध्ये
1.हॉटेल अजंठा चौक, राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलाच्या खालील जागा विकसित करणे याकरीता 1 कोटी 87 लाख रुपये,2.अजिंक्यतारा किल्ला रस्ता विकसित करणे भाग एक आणि दोन असे मिळुन रुपये 3 कोटी 45 लाख रुपये, (दोन कामे)3. प्रभाग क्रमांक 14 केसरकरपेठ, सि.स.नं. 46-अ,नाल्याजवळी रिटेनिंग वॉल बांधणे,17 लाख रुपये4. बगाडे हॉस्पिटल- कुंभारवाडा ते श्री. छ.शाहु उद्यान आणि तसेच पुढे श्री. टोपेमामा दत्त मंदिर अखेर रस्ता डांबरीकरण करणे 1 कोटी 99 लाख रुपये,5.यादोगोपाळपेठ मिरेकर चौक ते बालाजी नगरी व प्रभाग क्र.19 डॉ.पाटील दवाखाना ते बोगदा रस्ता डांबरीकरण करणे रुपये 1कोटी 50 लाखरुपये 6.साई बाबामंदिर ते कल्याणी शाळा रस्त्यावरील बॉक्स कल्वर्ट पूलाचे बांधकाम करणे रुपये 76 लाख रुपये.7.सातारा शहर पश्चिम भागातील रस्ते दुरुस्त करणे रुपये 76 लाख 40 हजार8. सातारा शहरातील मुख्य रस्त्यांना थर्मोप्लास्ट पेंट मारणे व रह दारीच्या विविध उपाययोजना करणे याकरीता 52 लाख रुपये
9. स्व. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादामहाराज चौक (बॉम्बेरेस्टॉरंट) ते मंगलमूर्ती रेसिडेन्सी अपार्टमेंट अखेर गटर करणे रुपये 1 कोटी 60 लाख रुपये असा एकूण 12 कोटी 64 लाख रुपयांचा निधी मंजूर होवून प्राप्त झाला आहे.
याकामांच्या निविदा, सातारा नगर परिषदेमार्फत दिनांक 09/01/2023 रोजी काढण्यात आल्या आहेत
आता निकषानुसार पात्र निविदाधारकांना या विविध कामांच्या वर्कऑर्डर्स दिल्या जातील.तसेच सदरची कामे लवकरात लवकर पूर्ण करुन घेण्या बरोबरच ही सर्व कामे दर्जेदार पध्दतीने करुन घेण्यावर सातारा विकास आघाडीचे आणि आमचे स्वतःचे लक्ष राहणार आहे.तसेच नियोजन समितीमधुन वरील मंजूर कामां व्यक्तीरिक्त आणखी काही विकास कामांचे प्रस्ताव साताराविकास
आघाडीने आमच्या माध्यमातुन दिले आहेत.त्यामध्ये बॉम्बेरेस्टॉरंट आणि खेड चौक येथील उड्डाण पूलाखालील जागेचेसुशोभिकरण यांचेसह लोकांच्या हिताच्या कामांचा समावेश आहे. पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांच्यामुळे या सर्व कामांना देखिललवकरच निधी मिळेल याचा आम्हाला विश्वास आहे असेही खासदार श्री छउदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.दरम्यान, नुकत्याच झालेल्या प्रशासकीय सभेत, सातारा नगरपरिषदेचे प्रशासक यांनी 183 विविध लोकोपयोगी विकास कामे मंजूर केली आहेत.ही सर्व कामे सातारा शहर आणि हददवाढ भागातील आहेत.सदरची कामे सुध्दा निविदा सोपस्कार पूर्ण झाल्यावर लवकरच सुरु होवून चांगल्या त-हेने पूर्ण होतील याकडे प्रशासनाने लक्ष दयावे अश्या सूचनाही आम्ही नगरपरिषद
प्रशासनाला दिलेल्या आहेत असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.








