सातारकरांच्या समस्या सोडवण्यासाठी वाट्टेल ते करणार आ. शिवेंद्रसिंहराजे

435
Adv

सातारा शहराची हद्दवाढ करून त्रिशंकू भाग विकासाच्या प्रवाहात आणला. साताऱ्यात मेडिकल कॉलेज सुरु केले. कास धरणाची उंची वाढवून पुढील पन्नास वर्षांचा पाणीप्रश्न कायमचा मिटवला. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यावर भर दिला आहे. सातारा शहराचा कायापालट करतानाच सातारकरांच्या सर्वप्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी वाट्टेल ते करू, असा शब्द श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.

सातारा- जावली मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात पदयात्रांचा धडाका सुरु झाला असून बुधवारी सकाळी अदालतवाडा, वाघाची नळी, पटवर्धन बोळ, कमानी हौद, कूपर कारखाना ते नगरपालिका, शाहू चौक अशी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, आरपीआयसह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दोन्ही आघाड्यांचे सर्व आजी – माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पदयात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाल्याने पदयात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप आले होते. पदयात्रामार्गावर ठिकठकाणी माता- भगिनींनी शिवेंद्रराजेंचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले. शिवेंद्रराजेंनी मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. रस्त्यांची समस्या कायमची सोडवण्यासाठी रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यावर आगामी काळात भर देणार आहे. कास धरणाची उंची वाढवली असून नवीन जलवाहिन्यांद्वारे कासचे पाणी सातारकरांना देण्यात येत आहे. सर्वप्रकारची कामे मार्गी लावली असून आगामी काळात सातारा शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द शिवेंद्रसिंहराजेंनी दिला. सातारकरांनी आपले प्रेम कायम ठेवावे. मला मताधिक्य देऊन विजयी करावे, असे आवाहन नागरिकांना केले.

चौकट……
गुरुवार दि. ७ रोजी सकाळी ७ वाजता एमजीपी कार्यालय, एसटी कॉलनी, फिनिक्स बंगला, अजिंक्य बाजार चौक, जगताप हॉस्पिटल, काळोखे वस्ती, मशीद, मारुती मंदिर, रणजित साळुंखे घर, माळी आळी, छ. अभयसिंहराजे भोसले कमान, हायवेने मस्केवाडा, जिजामाता उद्यान, बागड वस्ती, गोडोली चौक, जुनी शाळा, भैरवनाथ मंदिर, खामकर चौक, साई पतसंस्था, गोडोली जकात नाका अशी पदयात्रा होणार आहे. रात्री ८ वाजता लक्ष्मी आई मंदिर गडकर आळी येथे कोपरा सभा होणार आहे. पदयात्रा व कोपरा सभेला सर्व पदाधिकारी, आजी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Adv