सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 ला सामोरे जात असताना,गेली कित्येक वर्षे बळीराजाला पीळणारी जुलमी राजवट उलटथून टाकण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विनंतीस मान देऊन सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्ट कारभारास मूठमाती देऊन बळीराजाला न्याय देण्यासाठी शेतकरी संघटनेस पाठिंबा देण्याचा निर्धार जाहीर केला.
राजे जगाचा पोशिंदा भरडतोय, दिवसाढवळ्या त्याच्या हक्काचा खून होतोय, शेतकरी संघटना मावळ्यांच्या रूपाने या जुलमी राजवटीच्या विरोधात लढण्यास सज्ज आहे, राजे तुम्ही आदेश द्या आणि फक्त लढ म्हणा!अशी भावनिक साद त्यांनी घातली.
क्षणाचा ही विलंब न लावता बळीराजा च्या होणाऱ्या पिळवणुकीचे उच्चाटन करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची माझी तयारी असून कोणताही राजकीय स्वार्थ मनात न ठेवता जे जे लोक बळीराजाच्या मदतीसाठी येतील त्या सर्वांना घेऊन ताकतीने पॅनल उभे करा व हम करोसो कायदा” म्हणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन केले.
शेतकऱ्यांवरती होणाऱ्या अन्याया विरुद्ध लढण्यासाठी माझी पूर्ण तयारी असून, पाठीमागे झालेल्या चुकांची पुनरावृत्ती भविष्यात होऊ देणार नाही असा शब्द कार्यकर्ते व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
छत्रपतींच्या राजधानीत खऱ्या अर्थाने बळीराजाचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी आजच्या बैठकीमुळे शेतकऱ्यांमध्ये नक्कीच चैतन्य निर्माण होईल.याचा परिणाम कधी उसाच्या तर कधी टक्केवारीच्या विळख्यात अडकलेला शेतकरी खऱ्या अर्थाने बाजार समितीवर मालक म्हणून बसलेला दिसेल .
जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे धोरण नजरेसमोर ठेवून, छत्रपतींच्या राजधानीत व क्रांतिकारकांच्या व सैनिकांच्या जिल्ह्यात जय शिवराय ! जय जवान जय किसान !चा नारा देत सैनिकांचे गाव असलेले मि.अपशिंगे येथील शहीद स्मारकाला अभिवादन करून सायकांळी ५.०० वाजता प्रचाराचा शुभारंभ होईल. तरी शेतकरी, व्यापारी यांना मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन करतो.
प्रत्येक घराघरात जय शिवराय ! जय जवान जय किसान! चा नारा पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आमची असून सर्वांनी एकजुटीने एक दिलाने कामाला लागू या असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे पाटील, रयतक्रांती शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश (सोनु) साबळे, श्रमीक मुक्तीदल जिल्हाध्यक्ष चैतन्य दळवी, सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शशिकांत वाईकर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.