जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या बदलीचा सुशांत मोरे यांच्याकडून निषेध

853
Adv

राजकीय दबावाने सातारा जिल्हाधिकारी रुजेश जयवंशी यांची बदली झाल्याने जिल्ह्यात नाराजीचा सूर उमटला आहे या बदलीचा जाहीर निषेध करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सांगितले

सध्या चालू असलेली महाबळेश्वर मध्ये अतिक्रमण विरोध मोहीम व येणाऱ्या काळात कास अतिक्रमणावर पडणारा हातोडा याचाच लोकप्रतिनिधी यांनी धसका घेतल्याने सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली करणाऱ्या मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सातारानामाशी बोलताना सांगितले

जिल्हाधिकारी जयवंशी यांची बदली कशी थांबवता येईल यासाठी प्रयत्न करणार असून चांगले अधिकारी जिल्ह्यात काम करत असतील तर त्यांच्यावरील अन्याय सहन करणार नसून लोकप्रतिनिधींच्या दबावानेच जिल्हाधिकारी यांची बदली झाली असुन त्या बदलीचा निषेध सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला आहे

Adv