तेरे बिना जिया जाये ना..! वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उदयनराजेंनी गायले गाणे

107
Adv

साताऱ्यात भाजपचे खासदार छ‘उदयनराजे भोसलेंचा’ अंदाज नेहमी हटके असतो. ते कधी काय करतील याचा कोणालाच अंदाज लागत नाही. राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवून दिला होता. मजबूत शरीरयष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात बोलबाला असतो.

युवकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या उदयनराजेंनी उगारलेलं बोट, उडविलेली कॉलर, काय बाई सांगू कसं गं सांगू…. हे म्हणलेलं गाणं, त्यांची 007 क्रमांकाच्या जिप्सीचं नेहमी सर्वांना आकर्षण असतं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा साताऱ्यात पाहायला मिळाला आहे. नुकतंच साताऱ्यातील गांधी मैदानावर छत्रपती उदयनराजे भोसले यांचा 57 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर या म्युझिकल कपलच्या ‘जल्लोष गाण्यांचा’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Adv