राजवाडा बागेत खेळण्यांपेक्षा फ्लेक्सलाच प्राध्यान्य

31
Adv

साताऱ्यातील बागांचा विकास करण्यापेक्षा बागेमध्ये मोठ्या फ्लेक्सच्या होर्डिंगलाच प्राधान्य दिले असल्याने याचा मास्टरमाईंड कोण व कोणाचे झाले लक्ष्मी दर्शन याची चर्चा साताऱ्यात रंगते

मुंबईत मोठ्या फ्लेक्स च्या दुर्घटनेने अनेकांचा जीव गेला होता साताऱ्यात मात्र मोठमोठे होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी मिळत असून पालिकेवर दबाव टाकून मोठे फ्लेक्स बोर्ड उभारणारा तो चाणक्य कोण याची चर्चा साताऱ्यात रंगत आहे फ्लेक्स बोर्ड अधिकृतपणे उभारत असले तरी लक्ष्मी दर्शन घेऊन बोर्ड उभारण्यासाठी परवानगी देणाऱ्यालाच एखादी दुर्घटना घडल्यावर दोषी ठरवले पाहिजे अशी मागणी सातारकर करत आहेत

फ्लेक्स बोर्डसाठी झाडांच्या फांदीची तोडमोड झाली यासारखे दुर्दैव तरी काय पालिका अधिकारी यांचा काही या दोष नसून मोठ मोठे होर्डिंग उभे करून स्वतःसह चाणक्याची खळगी भरणारे लोकप्रतिनिधी आता पालिकेत निवडून येणार त्यामुळे अनधिकृत कामांना जोर येणार असल्याचे दिसून येते

Adv