आमचे मार्गदर्शक मित्र हितचिंतक सातारा विकास आघाडीच्या स्थापनेपासून आतापर्यंत सातारा विकास आघाडीचे जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे अनेकांना नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष तसेच जिल्ह्यातील विविध पदांवर काम करण्यासाठी संधी देणारे सन 2006 पासून सन 2016 पर्यंत आम्ही दोघेही 365 दिवसातले तीनशे दिवस एकत्र असायचे या काळात त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं नगरपालिकेतील कामकाज कसे करावे हे दत्तात्रय बनकर साहेब यांच्याकडून शिकावं मागे एकदा बनकर साहेब मनोमिलनातून उपनगराध्यक्ष झाले होते आत्तासुद्धा मनोमिलनातून त्यांना उपनगराध्यक्ष पदावर विराजमान होण्याची संधी प्राप्त झाली यावेळी आमचे दैवत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यांच्या विषयी केलेले वक्तव्य अत्यंत योग्य आहे पण बनकर साहेब हे असा रसायन आहे की ते कुणालाच कळत नाही कधी कधी ते महाराजांना पण कळत नाही बनकर साहेबांनी माझी पत्नी दिपाली हिला सातारा नगरपालिकेच्या सातारा शहर नियोजन विकास समितीच्या सभापतीपदी व काही काळासाठी उपनगराध्यक्ष पदासाठी जी संधी मिळाली त्यात बनकर साहेबांचा मोलाचा वाटा आहे
बनकर साहेबांच्या दूरदृष्टीतून सातारा शहरात स्माईल स्टोन ठरणारे अनेक प्रकल्प उभे आहेत मग त्यात श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज आयुर्वेदिक उद्यान असेल सातारा शहरातील नगरपालिकेच्या शाळा असतील ग्रेड सेपरेटर पत्रकार भवन असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नगरपालिकेची जी सातारा शहरात नवीन मोठी इमारत उभी राहत आहे ती जागा मिळवण्यापासून ते बांधकाम पूर्ण करण्यापर्यंत त्यांनी केलेला पाठपुरावा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालील दिमागदारपणे उभी राहिलेली सातारा नगरपालिकेची इमारत हे त्यांच्या कामाची साक्ष आहे अशा या आमच्या मार्गदर्शक असलेल्या दत्तात्रय बनकर यांना सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नियुक्ती केल्याबद्दल आदरणीय बनकर साहेब यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा
महत्त्वाची टीप… आत्ता निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मध्ये अनेक नगरसेवक बनकर साहेब हे नवीन आहेत त्यामुळे तुम्ही लक्ष घातलं तरच त्यांना काम कसे करायचे हे कळणार आहे त्यामुळे तुम्ही कृपया तुमचा फोन बंद ठेवणे किंवा कार्यकर्त्यांना भेटणे किंवा अचानक साताऱ्यातून गायब होऊ नका
शुभेच्छुक आपलाच राजू गोडसे मित्र समूह सातारा






