छ उदयनराजे समर्थकाचा पनवेल ते सातारा पायी प्रवास, ७ तारखेला सकाळी जलमंदिर ला पोहचणार

571
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साताऱ्यात नुकताच संपन्न झाला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना शुभेच्छा देण्यासाठी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचा कार्यकर्ता विजय शिंदे पनवेल ते सातारा असा पायी प्रवासाला निघाला आहे .

पनवेल ते सातारा हे अंतर तब्बल 222 किलोमीटरचे आहे . खासदार उदयनराजे भोसले यांचे चाहते उभ्या महाराष्ट्रात आहे विजय हा सुध्दा असाच उदयनराजे यांचा कट्टर समर्थक आणि चाहता आहे . यंदाचा उदयनराजे यांचा वाढदिवस वेगळ्या पध्दतीने साजरा करण्याचे विजयने ठरवले होते . तो निश्चय खरा करण्यासाठी विजय शिंदे पनवेल वरून पायी निघाला आहे .सात तारखेला सकाळी जलमंदिर येथे येऊन खासदार उदयनराजे भोसले यांना शुभेच्छा देणार आहे

राजे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, केवल महाडिक, सुनील वरेकर , प्रशांत पिसाळ, सदाशिव मोरे, किरण पालये यांनी विजयला त्यांच्या पायी मोहिमेच्या शुभेच्छा दिल्या असून सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे .

Adv