गेल्या १२-१३ वर्षापासुन राजे प्रतिष्ठान ही सामाजिक संघटना, समाजामध्ये आमच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. या सामाजिक संघटनेत नवीन तरुणांना संधी देण्याच्या उद्देशाने,राजे प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीमध्ये संघटनात्मक बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच समाजाचेहिताकरीता झटणा-या, राजे प्रतिष्ठानचे सेवा भावी आणी निस्वार्थी कार्यकत्यांची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे.
समाजाच्या सुख दुखाःशी एकरूप होवून, कोणत्याही प्रकारे कोणावरही अन्याय होवू नये यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणाऱ्या निस्वार्थी तरुणांची आणि अनुभवी व्यक्तींची संघटना म्हणून राजे प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, ही सामाजिक संघटना महाराष्ट्रभर ओळखली आहे. आमच्या अधिपत्याखाली अनेक छोटे मोठे उपक्रम राजे प्रतिष्ठानच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात आणि राज्यात राबविले गेले आहेत.
शासनाच्या धर्मादाय कार्यालयात विश्वस्त संस्था म्हणून नोंदणीकृत असलेली आमच्या अध्यक्षतेखालील ही सामाजिक संस्था, सामाजिक, शैक्षणिक, सार्वजनिक कार्यात आपला वाटा उचलण्यात नेहमीच अग्रेसर राहीली आहे. अनेकांना मदतीचा हात देताना समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो हा प्रामाणिक उद्देश या संघटनेच्या स्थापनेमागे आमचा राहीला आहे.
या संस्थेचे कार्य अधिक चांगल्या पदोसोपान संघटना पध्दतीद्वारे समाजातील सर्व स्तरापर्यंतपोहचवण्यासाठी नुकताच प्रतिष्ठानच्या कार्याचा नियोजनात्मक आढावा नुकताच घेण्यात आला. त्यामध्ये अनेक विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यात आल्या आहेत.त्यानुसार राजे प्रतिष्ठानच्या कार्यकारणीवर समाजकार्य आणि सेवाकार्य करण्यासाठी नवीन चेह-यांना संधी देण्याच्या उद्देशाने जुनीकार्यकारीणी बरखास्त करून,संघटनात्मक बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
राजे प्रतिष्ठानची कार्यकारणीमधील जरूर ते बदल लवकरच करण्यात येत असुन त्यानुसार नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात येईल समाजाने या संघटनात्मक आणि धोरणात्मक बदलाची आवश्यक ती नोंद घ्यावी.