भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, भारतीय जनता पार्टी तर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा सुशासन पंधरावड्याचे आयोजन करण्यात येत असते
या सेवा सुशासन पंधरावड्या मध्ये आरोग्य, स्वच्छता, क्रीडा, चित्रकला स्पर्धा या आणि इतर सेवा विषयाचे कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांना बरोबर घेऊन केले जातात
याच कार्यक्रमांतर्गत दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात नमो युवा रन, मॅरेथॉन चे आयोजन करण्यात येत आहे
सातारा जिल्ह्यात या मॅरेथॉन ची तयारी पूर्ण झाली असून ” नमो युवा रन, राजधानी सातारा” असे नाव या मॅरेथॉन ला देण्यात आले असून खा छ.उदयनराजे भोसले,सार्वजनिक बांधकाम मंत्री ना छ.शिवेंद्रसिंह राजेभोसले, ग्रामविकास मंत्री ना जयकुमार गोरे, भाजपा आ.मनोज घोरपडे,माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आ.विक्रांत पाटील ,माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम, समन्वयक सुनिल काटकर,माजी आ.दिलिप येळगावकर,मदन भोसले,आनंदराव पाटील,सत्यजितसिंह पाटणकर,भा ज पा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,प्रदेश सचिव भरत पाटील,प्रियाताई शिंदे,रामकृष्ण वेताळ,अनुप मोरे, लोकसभा समन्वयक सुनील काटकर , राजुभय्या भोसले,प्रदेश सदस्य अविनाश कदम, उपनगराध्यक्ष अमोल मोहिते ,संग्राम बर्गे, सुदर्शन पाटसकर, सुरभी भोसले यांच्या बरोबरच सर्वच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
नमो युवा रन , राजधानी सातारा २०२५, नाशामुक्त भारत मॅरेथॉन च्या कार्यक्रमाच्या पत्रिकेचे अनावरण नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले , यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि सर्वांना शुभेच्छा
दिल्या
मॅरेथॉन साठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली असून जवळपास २००० स्पर्धकांनी यात सहभाग घेतला आहे , दिनांक २० रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत छ शाहू महाराज स्टेडियम येथे एक्स्पो चे आयोजन करण्यात आले असून , नोंदणी केलेल्या स्पर्धकांना त्या ठिकाणी आवश्यक साहित्यांचे वितरण करण्यात येणार आहे , याच प्रमाणे मॅरेथॉन च्या पूर्ण मार्गावर पाणी, औषधे या साठी वॉटर स्टेशन ची व्यवस्था करण्यात आली असून स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी विविध ठिकाणी महाराष्ट्रातील लोकनृत्य करण्यात येणार आहेत
पोलिस परेड ग्राउंड वरून दिनांक २१ तारखेला सकाळी ६.३० वाजता मॅरेथॉन ला सुरुवात करण्यात येणार असून शिवतीर्थ, महाराजा सयाजीराव विद्यालय, नगरपालिका कार्यालय, कमानी हौद, देवी चौक, मोती चौक , गोलबाग , परत मोती चौक , पंचमुखी गणपती मंदिर, शनिवार चौक, शेटे चौक, पोलिस मुख्यालय, पोवई नाका आणि परत पोलिस परेड ग्राउंड या ठिकाणी मॅॅरेथॉन चा समारोप होईल
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लोकसभा समन्वयक सुनील काटकर,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, श्रवण जंगम, तेजस जगताप, प्रथमेश इनामदार, प्रविण कणसे,भाजपा सरचिटणीस संतोष कणसे, विठ्ठल बलशेठवार,धनाजी पाटील, विकास गोसावी, संदीपभाऊ शिंदे, प्रवीण धस्के , मंडलाध्यक्ष वैशाली टंकसाळे , अविनाश खर्शीकर,महेश गाडे, विजय गुजर,उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खरात, अमोल सणस,प्रवीण धस्के,हृदयनाथ पार्टे,लक्ष्मण कडव,डॉ.दयानंद घाडगे, डॉ निलेश थोरात ,राहुल गोडसे, समीर निकम, शफी इनामदार, श्री.हर्षवर्धन शेळके,श्री.शैलेश संकपाळ ,श्री.रोहित सावंत,श्री.अमोल कांबळे,श्री.गौरव इंगवले,कु पायल जाधव , राहुल शिवनामे, विक्रम बोराटे, विक्रांत भोसले, नितीन कदम , डॉ उत्कर्ष रेपाळ, ऍड प्रशांत खामकर, दिपक फाळके,विशाल कुलकर्णी,विशाल घोरपडे,ओंकार पाटील,अक्षय थोरवे,गणेश जायगुडे ,वैभव सकुंडे, प्रवीण शिंदे,शिवम सूर्यवंशी,निलेश भोसले,प्रशांत पोतेकर,,संदिप माने,तेजस कदम,आशिष सकुंडे ,प्रशांत जाधव,,सनी साबळे,अनिकेत निकम,यशोवर्धन मुतालिक,श्रीधर हादगे ,अक्षय चांगण,रोहिदास नवसरे,इम्तियाज मुलानी,यश माने,रत्नदीप जाधव,हरीश नातू,हर्षल गुरव,ऋषिकेश पाटील
,प्रथमेश इनामदार, नरेंद्र सावंत,प्रथमेश मोरे ,श्रेयस शिंदे व भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील आघाडी मोर्चा जिल्हा पदाधिकारी प्रयत्न करत आहेत.
“नमो युवा रन, राजधानी सातारा , नशा मुक्त भारत मॅरेथॉन ” च्या स्वागतासाठी आणि स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सर्व सातारकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ अतुल भोसले यांनी केले