रचना 2022 प्रदर्शनाला दिली छ उदयनराजे भोसले यांनी भेट

339
Adv

राज्याची अर्थव्यवस्था विस्तारित करण्यामध्ये बिल्डर लोकांचा मोठा वाटा आहे सातारा जिल्हा बिल्डर असोसिएशनचे जे प्रश्न असतील ते त्यांनी माझ्याकडे जरूर मांडावे केंद्र शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून ते प्रश्न निश्चित सोडवले जातील केंद्र शासनाच्या अनेक योजनांचा त्यांना लाभ मिळवून दिला जाईल असे स्पष्ट आश्वासन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले

बिल्डर असोसिएशनच्या वतीने येथील सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर आयोजित रचना 2022 प्रदर्शनाला उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भेट दिली . या भेटीमध्ये त्यांनी प्रत्येक स्टॉलला आवर्जून भेट दिली यावेळी त्यांचे सहकारी माजी उपनगराध्यक्ष राजू भोसले बाळासाहेब ढेकणे तसेच बिल्डर असोसिएशन चे अध्यक्ष राजेश देशमुख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. खा छ उदयनराजे भोसले यांनी बिल्डर असोसिएशनच्या सर्व सदस्यांची आवर्जून भेट घेत अत्यंत देखण्या नियोजनाबद्दल रचनाच्या संयोजकांचे तोंड भरून कौतुक केले

यावेळी बोलताना खासदार छ उदयनराजे भोसले म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्था ही वेगाने विस्तारत आहे राज्याच्या उत्पादन संकलनात गृहप्रकल्प बांधणाऱ्या विकासकांचा मोठा वाटा आहे ऑनलाइन नोंदणीच्या माध्यमातून अर्थव्यवस्था वेगाने विस्तार पावत आहे सातारा जिल्ह्यातील बिल्डर असोसिएशनच्या ज्या ज्या समस्या असतील त्या त्यांनी जरूर मांडाव्यात केंद्रशासनाच्या माध्यमातून ते प्रश्न तातडीने सोडवले जातील सातारा शहर आणि जिल्हा येथील विकास कामांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यास आम्ही कधीही कमी पडणार नाही केंद्रशासनाच्या येथे अधिवेशनातही अनेक विकास कामांचा पाठपुरावा आमच्याकडून सुरू आहे अशी स्पष्ट ग्वाही उदयनराजे यांनी दिली सर्व स्टॉल्स खा छ उदयनराजे यांनी स्वतःच फिरून पाहिले प्रत्येक प्रॉडक्टची त्यांनी आवर्जून माहिती घेतली सुमारे दीड तास त्यांनी संपूर्ण रचना प्रदर्शन पाहून बिल्डर असोसिएशन सातारा चे तोंड भरून कौतुक केले

Adv