प्राईम रेसिडेन्सीला सुशांत मोरेंचा दणका

305
Adv

सातारा : सैदापूर, ता. सातारा येथील प्राईम रेसिडन्सी इमारतीत कॉमन पार्किंग व मोकळी जागा काही रहिवाशांना बेकायदेशीर विकली आहे. त्यावर सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेवून प्रांतांनी संबंधित बांधकाम तातडीने काढण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत सुशांत मोरे यांनी माहिती दिली की, सैदापूर येथील सर्व्हे नंबर ७०/अ/१ भूखंड क्र. १४ व १५ एकूण क्षेत्र ५४३.६८ या इमारतीचे जागा मालक जहिर शेख (रा. रविवार पेठ, सातारा) व बांधकाम व्यावसायिक विजय जगदाळे (रा. जगदाळे बाग, गोळीबार मैदान, गोडोली) यांनी २०१३ मध्ये बांधकाम परवाना मंजूर करुन प्राईम रेसिडन्सी ही इमारत उभी केली आहे. त्यात कॉमन पार्किंग व मोकळी जागा काही रहिवाशांना बेकायदेशीरपणे विकली आहे. ते बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी दि. १५ जून २०२२ मध्ये जिल्हाधिकारी व सहायक नगररचना अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
त्यानुसार प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडे सुनावणी झाली. २०१४ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, नगररचना विभागाने बांधकामास परवानगी दिली आहे. प्राईम रेसिडन्सीमध्ये प्लॉट नंबर जी १ व जी २ च्या मालकांनी प्लॉटच्या बाजूच्या मोकळ्या जागेमध्ये पत्रा टाकून बंदीस्त केले आहे. नगररचना विभागाचे सहायक संचालकांनी दि. ९ डिसेंबर २०२२ मध्ये स्थळ पाहणी केली होती. त्यांच्या अहवालात त्यांनी पत्रा व लोखंडाचे शेडचे अतिरिक्त बांधकाम केल्याचे नमूद केले आहे.
यावर प्रांताधिकारी मुल्ला यांनी मंजूर आराखड्या व्यतिरिक्त केलेले अनधिकृत बांधकाम स्वखर्चाने काढून टाकावे. तसेच सर्व सदनिकाधारकांनी नियमानुसार सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करावी, असे आदेश दिले आहेत.

Adv