अनेक वर्षापासून पालिकेचा कर बुडवून पालिका व शहराच्या नाकावर टिच्चून आपला व्यवसाय वाढवणारे जुना मोटर स्टँड येथील पेट्रोल पंप आता पालिका प्रशासनावर वर चढ होत असल्याचे दिसून येते
जुना मोटर स्टँड येथील दोन पेट्रोल पंप गेल्या दहा वर्षापासून अतिक्रमण करून आपला व्यवसाय सुरूच ठेवला आहे पालिका प्रशासन ही आता त्यांच्या पुढे काही करू शकत नसल्याचे दिसून येते त्याला कारणही तसेच असल्याचे दिसून येते पालिका प्रशासनाने मुख्याधिकाऱ्यांच्या सहीने दिनांक 3 ,5 ,21 रोजी सदरच्या पेट्रोल पंपाची जागा ताब्यात देण्यात यावी अशी नोटीस मुख्याधिकारी नी धाडली होती या नोटिशीला कुठलाही प्रतिसाद न दिल्याने पालिकेच्या जागेत व्यवसाय करणारे पेट्रोल पंप आता पालिका प्रशासनावर वरचढ होत असल्याचे दिसून येते
मुख्याधिकारी साहेब पेट्रोल पंपाला दणका द्या
मुख्याधिकारी अभिजित बापट हे अतिशय कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी म्हणून राज्यात त्यांचा नावलौकिक आहे त्यांच्याच सहीने पेट्रोल पंप चालकांना गेल्या काही महिन्यांपूर्वी नोटीसही धाडली होती मात्र प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या प्रशासनाची किंमत कमी होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनावर पेट्रोल पंप चालक वरचढ होऊ द्यायचा नसेल तर पालिका प्रशासनाने आता तरी पेट्रोल पंप चालकांना धडा शिकवायला हवा अशी अपेक्षा सातारकर नागरिक करत आहेत