Thursday, April 2, 2026
spot_img
Home Satara District Satara City पेढ्याच्या भैरोबा यात्रा मार्गावरील रस्त्याचे पॅचिंगचे काम पूर्ण

पेढ्याच्या भैरोबा यात्रा मार्गावरील रस्त्याचे पॅचिंगचे काम पूर्ण

18
Adv

सातारकरांचे ग्रामदैवत असलेल्या श्री पेढ्याच्या भैरोबाची यात्रा रविवार दिनांक पाच एप्रिल रोजी होत असून पालखी मार्गावर बरेच खड्डे पडले होते या सर्व रस्त्यांची पाहणी करून नगरसेवक विश्वतेज बालगुडे यांनी रस्त्याच्या खड्ड्यांच्या पॅचिंग ची कामे करून घेतल्याने गडकर आळी येथील नागरिक म्हणतात वेल डन बालगुडे मेहरबान

सातारचे ग्रामदैवत म्हणून श्री पेढेच्या भैरोबाची ओळख दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी होणार असून गडकरआळी ते पेढ्याचा भैरोबा मंदिर मार्गावर बऱ्याच खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते या रस्त्याची बालगुडे यांनी प्रत्यक्षरीत्या जाऊन पाहणी केली व पालिकेच्या बांधकाम विभागामार्फत रस्त्यांचे पॅचिंग करून यात्रेच्या आधी रस्त्याचे काम मार्गी लावल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे

बालगुडे हे नेहमी काम करण्यात अग्रेसर असतात कुठला ही दिखावा चमकोगिरी अजिबात करत नाहीत मात्र काही संबंध नसलेले पदाधिकारी यांचे नातेवाईक याच यात्रेच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम अंतर्गत लुडबुड करण्याचा प्रयत्न करताना दिसून आले

Adv