सातारकरांना विकास हवा आहे. पंपिंगचा खर्च करुन नव्हे तर गुरुत्वाकर्षण पध्दतीने पाणी हवे आहे. पेन्शनर्स सिटी ही सातारची ओळख पुसायची आहे.एकछत्री स्वार्थी कारभार करणारे आणि संस्था, बॅन्का मोडून खाणारे सातारकरांना नको आहेत. आमचे ढोल वाजवायचे सोडा, पण सातारकरांनी तुमचा ढोल जो चांगलाच बडवला आहे त्याचा विचार करा. सातारकरांच्या नावाखाली वेड पांघरुन पेडगांवला जाणारे किती दिडशहाणे आहेत हे सातारकरांना आता समजुन चुकले आहे असा घणाघात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
यांनी टिकाकारांवर नांव न घेता केला.आदरणीय स्वर्गीय काकांच्या माघारी टिका न करता, आपलं काम करत राहयचं असं ठरवलेले होते. परंत यांचे येरे माझ्या मागल्या सुरु झाल्याने आम्हाला बोलाव लागतंय असे नमुद करुन, खासदार श्रीमंतछत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे
पोवईनाका येथे ग्रेडसेपरेटर पाहीजे अशी मागणी सातारकरांची तसेच अनेक संस्था संघटनांनी केली होती. ती मागणी सर्वाच्या सहकार्याने आम्ही पुरी केली. ग्रेडसेपरेटरच्या उद्घाटन मुहूर्ताची वाट न बघता आम्ही तो जनतेसाठी खुला करायला लावला.
त्यांनतर तत्कालीन पालकमंत्री यांच्या हस्ते ग्रेडसेपरेटरचे उद्घाटन झाले त्यावेळी आज सातारकरांच्या आडून टिका करणारे संधीसाधु उदघाटनाला पुढे-पुढे करत होते. हे दुटप्पी ढोंग आहे असा पलटवार देखिल केला आहे.ग्रेडसेपरेटरचे काम फसलेले नाही तर श्रेय लाटण्यात माहीर असतानाही तुमची येथे फसगत झाली आहे
ग्रेडसेपरेटरचे काम फसलेले नाही तर श्रेय लाटण्यात माहीर असतानाही तुमची येथे फसगत झाली आहे हे तुमचे खरे अवघड जागीचे दुखणे आहे. आज श्रेय तुम्हाला मिळत नाही म्हणून खीन्न् होवू नका, खरे श्रेय विकासाचा ध्यास असणा-या सातारकरांचे आहे.पोवई नाक्यावर अनेकजण बसतात. त्यापैकी बनकर एक असतीलही किंवा नसतीलही,परंतु सर्वेक्षण शासन पातळीवर झाले आहे.आमच्या माहीतीप्रमाणे बनकर त्यांना खुप घाबरतात. परंतु येथे तर उलट दिसतेय,त्यांनीच बनकरांचा धसका खाल्लेला दिसतोय. हे नवल आहे.आज अपवाद बगळता सर्व बसेस ग्रेडसेपरेटर मधुनच जात आहेत. पोवई नाक्यावरील वाहतुकीची समस्या निश्चितच संपुष्टात आलेली आहे. वाहतुकीच्या ऐन भरात देखिल पोवईनाक्यावर कोंडी होत नाही ही वस्तुस्थिती आहे. उगाच तोडाची वाफ दवडून, आपले अधिक हसे करुन घेवू नका असे सडेतोड बोल देखिल
सुनावले आहेत.सातारचा ग्रेडसेपरेटर तांत्रिक व्यावहारिक दृष्टया परिपूर्ण आहे. त्याचा वापरही चांगला होत आहे, होणार
आहे. सातारच्या विकासातील मैलाचा दगड (माईल स्टोन) म्हणून डसेपरेटर कडे सातारकर बघत आहेत.आम्ही काम करत राहणारे आहोत.निवडणुकीतील मतांपेक्षा विचारांचे मत आम्हास महत्वपूर्ण आहे. चांगल्या विचारांची पाठराखण सातारकरांनी आजपर्यंत केली आहे. स्वार्थी विचारांना ते थारा देत नाहीत हा
अनुभव आहे. त्यामुळे निवडणुकीत सातारकर जे करतील ते योग्यच करतील, ते आम्हास शिरसावंदय असेल,सातारकरांच्या विकासाकरीता तुम्ही आजपर्यंत काय केले हे आधी सांगा, तत्वज्ञ नसतानाही दुस-यास सांगे तत्वज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण अशी तुमची अवस्था आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.
( श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले)